
Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारांमध्ये मोठा बदल आल्याचे दिसते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या (2020) तुलनेत यंदाच्या निवडणुकीत युवा उमेदवारांची संख्या घटली आहे. त्या तुलनेत ज्येष्ठ उमेदवारांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते.
नवी दिल्ली विधानसभेसाठी भावना (अपक्ष),राजेंद्र नगरमधून उमंग (अपक्ष), आदर्श नगर येथून उमंग (अपक्ष), आदर्शनगर येथून आयुष गुप्ता (अपक्ष), रोहिणी मतदारसंघातून हर्षद चड्डा (बीएसपी), विश्वास नगर येथून गुरमीत सिंह (जय महाभारत पार्टी) हे युवक दिल्ली विधानसभा निवणुकीत आपले नशीब अजमावित आहेत.
25 ते 40 वर्षांच्या उमेदवारांची संख्या गेल्या विधानसभा निवडणुकीत 242 होती ती आता 196 झाली आहे. 41 ते 59 या वयोगटातील उमेदवारांची संख्या वाढली आहे. 2020 च्या निवडणुकीत 338 उमेदवा रिंगणात होते, आता 2025 मध्ये ही संख्या 394 झाली आहे.
61 वर्षांनंतरच्या उमेदवारांची संख्येत वाढ झाली आहे. 2020 मध्ये 84 उमेदवार होते, त्यांच्या संख्येत वाढ होऊन ती संख्या आता 109 आहे. आम जनमत पार्टीचे उमेदवार राजेंद्र हे सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत, त्याचे वय 88 वर्ष आहे. तर जगदीश चंद (सीपीआईएम, वय 83), मोती नगर येथून निवडणूक लढवणार 81 वर्षीय राजेंद्र सिंह हे काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात आहेत.
दरम्यान, नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी चार दिवस बाकी असताना आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. आठ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गिरीश सोनी, वंदना गौर, रोहित मेहरूलिया,मदन लाल, राजेश ऋषी, बी. एस. जून, नरेश यादव आणि पवन शर्मा अशी या आमदारांची नावे आहेत.या आमदारांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ते नाराज होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे टेन्शन वाढलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने शनिवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात दिल्लीसाठी कोणतीही विशेष घोषणा करू नये, अशी सूचना केंद्र सरकारला निवडणूक आयोगाने केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात दिल्लीवासीयांना थेट काहीही मिळाले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.