"जाताना मी सुद्धा पारीख काकांची पप्पी घेवून जाणार" : शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर

छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) विरुद्ध आमदार शिवेंद्रराजे (Shivendraraje Bhosale)
Udayan Raje  Shivendra Raje

Udayan Raje Shivendra Raje

sarkarnama

सातारा : साताऱ्याचे राजकारण पुन्हा एकदा छत्रपती उदयनराजे (Udaynraje Bhosale) विरुद्ध आमदार शिवेंद्रराजे (Shivendraraje Bhosale) यांच्याभोवती केंद्रीत झाले आहे. एकाच पक्षात असणारे हे दोन नेते स्थानिक पातळीवर मात्र कायमच बहुतांशवेळा विरोधात (udayanraje bhosale vs shivendraraje bhosale) बघायला मिळतात. सध्या सातारा नगरपालिका निवडणुकीच्या (Satara Municipal Council Election) पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा सामना चांगलाच रंगला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतेच सातारा नगरपालिकेच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी त्यांनी “काय बाई सांगू? कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज” या गाण्यातून आमदार शिवेंद्रराजेंवर टीकास्त्र सोडले होते. तसेच त्यांनी शिवेंद्रराजेंना चर्चेला येण्याचे आव्हानही दिले होते. या कार्यक्रमादरम्यान छत्रपती उदयनराजे भावनिक देखील झाले होते. त्यावर आज शिवेंद्रराजेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

<div class="paragraphs"><p>Udayan Raje  Shivendra Raje</p></div>
'आताच्या काळात वाजपेयींच्या हिंदुत्त्वाची विटंबना होऊ नये हिच अपेक्षा'

शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीची माहिती घेतली. पण त्याचा प्रस्ताव नाही, नगपालिकेच्या बजेटमध्ये त्यासाठी एक रुपयाचीही तरतूद नाही, त्याला तांत्रिक मान्यता नाही. पण नारळ फोडून, गाणी गावून लोक मोकळी झाली. असे म्हणत त्यांनी उदयनराजेंना लक्ष्य केले. यावेळी शिवेंद्रराजेंनी उदयनराजे यांच्या गाण्याचाही समाचार घेतला. यावर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, उगाच गाणी म्हणण्यापेक्षा नेमकी तुम्हाला लाज कशाची वाटती ते सुद्धा एकदा सांगूनच टाका. सातारकरांना ही गोष्ट तरी कळूदे.

<div class="paragraphs"><p>Udayan Raje  Shivendra Raje</p></div>
अतिरिक्त SP, DySP आणि पोलिस निरीक्षक अशा तिघांकडून नितेश राणेंची कसून चौकशी

आता नेहमीच्या टेक्निक्स आणि नेहमीच १० मिनीट रडायच, पप्या घ्यायच्या असली नौटंकी आता बंद करा. आता मी ही जाताना पारीख काकांची पप्पी घेवून जाणार म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, असा टोलही त्यांनी हाणला. पुढे ५ वर्ष तुम्हाला सत्ता दिली त्यातील काम सांगा, असे आव्हानही शिवेंद्रराजेंनी यावेळी दिले. तसेच तुम्ही भ्रष्टाचार मुक्त करणार म्हणून सांगितले होते, स्त्रियांच्या हातात सत्ता देणार होता, त्याचे काय झाले? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यायला हवे. नुसतं ५ वर्षात टक्केवारी, बिल काढायची, नवीन नवीन प्रकल्प मोठ्या नावाने आणायचे, ते अर्ध्यात सोडून परत पैसे काढायचे हे सगळे बघितले असल्याचेही शिवेंद्रराजेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com