
Mumbai News: भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. माजी न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, 'माझे उत्तर अतिशय सोपे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणाची सुनावणी करावी, हे कुणी एका व्यक्तीने किंवा पक्षाने हे ठरवले पाहिजे का? कोणता एक पक्ष ठरवेल का की सर्वोच्च न्यायालय कुठला निर्णय घ्यावा. माफ करा पण, हे काम सरन्यायाधीशांचे आहे.
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) म्हणाले की, हे संपूर्ण वर्षभर आम्ही मूलभूत हक्कांवरील खटले, नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठांचे निर्णय, सात न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोरील खटले हाताळत होतो.
नुकत्याच झालेलल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता की, महाराष्ट्रात जे काही घडलं आहे त्याला सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) मीडियाशी बोलताना म्हणाले, 'निवडणुकांमध्ये हारजीत होते. परंतु पहिल्या दोन तासांत, जी लढाई बरोबरीत सुरू होती. जसं हरियाणामध्ये झालं. की अचानक पुढील दोन तासांत ज्या पद्धतीने निकाल लागले. हे संशायस्पद आहे. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. तरीही या सगळ्याला जर जबाबदार जर कोणी असेल, महाराष्ट्रीतील घडामोडींना ते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आहेत.'
'देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्याने वेळेत निर्णय द्यायला हवा होता. आमदार अपात्रतेच्या संदर्भात. मग तुम्ही कशाकरता बसलेले आहात. अडीच वर्ष जर तुम्ही निर्णय देत नसाल तर मग तुम्ही खुर्चा कशासाठी उबवता आहात? सरकारवरती का ओझं म्हणून जनतेच्या पैशांचा तुम्ही चुराडा करता आहात.
उद्धव ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे हे उत्तम प्राचार्य म्हणून बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत. पण सरन्यायाधीश म्हणून ते घटनात्मक पेचावर निर्णय़ घेऊ शकले नाहीत. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातील चित्र बदललं असतं.'
'आज जे तुम्हाला चित्र दिसतय ते चित्र नक्कीच दिसलं नसतं. आणि त्यांनी निर्णय़ न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेले आहेत. आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकतात. विकत घेवू शकतात, कारण कायद्याची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तीनीच ती भीती घालवली. या सगळ्या घटनांना चंद्रचूड हेच जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.