Digambar Kamat : माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सरदेसाईंचा जनता दरबार; कामतांनी एका वाक्यातच विषय मिटवला

Vijay Sardesai : चढाओढीच्‍या राजकारणात सरदेसाई यांनी टाकलेले हे पाऊल आमदार दिगंबर कामत यांची चिंता वाढविणारे ठरणार आहे.
Vijay Sardesai, Digambar Kamat
Vijay Sardesai, Digambar KamatSarkarnama
Published on
Updated on

Goa Political News : माजी मुख्‍यमंत्री आणि भाजप नेते दिगंबर कामत यांच्‍या बालेकिल्‍ल्‍यात म्‍हणजेच मडगावात आज गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी घेतलेल्‍या ‘जनता दरबार’ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्‍यांनी सांगितले की, मडगाव कोसळत चालले आहे. सर्व मडगावकरांनी एकत्र येऊन ते सांभाळण्याची गरज आहे.

सरदेसाई यांच्या या ‘जनता दरबार’ला २००हून अधिक लोकांची उपस्‍थिती होती. मडगावसह सासष्टीतील विविध भागांतील लोकांनी प्रश्‍‍न मांडले. चढाओढीच्‍या राजकारणात सरदेसाई यांनी टाकलेले हे पाऊल आमदार दिगंबर कामत यांची चिंता वाढविणारे ठरणार आहे.

दरम्‍यान, लोकांनी जमीन बळकाव प्रकरण, पर्यटन कायदा, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आदी विषय मांडले. काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो, भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक केतन कुरतरकर, अपक्ष नगरसेवक घनश्याम शिरोडकर उपस्‍थित होते.

‘जनता दरबार’मध्‍ये लोकांनी ज्‍या समस्या मांडल्या, त्यांचा अभ्यास करून येत्‍या विधानसभा अधिवेशनात आपण यासंदर्भात प्रश्‍‍न विचारणार आहे. यापुढे दर आठवड्याला पालिकेत येऊन लोकांच्या समस्या ऐकून घेणार आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.

Vijay Sardesai, Digambar Kamat
Rahul Gandhi Vs BJP : आषाढी वारीत राहुल गांधी...; भाजप नेत्यांची एवढी 'मळमळ' का ?

मडगाव नगरपालिकेतील ‘जनता दरबार’ घेऊन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना एक प्रकारे आव्हानच दिल्याचे बोलले जात आहे. यावर मडगावात येऊन कुणीही कितीही सभा घेतल्या तरी मला काहीच फरक पडत नाही, असे म्हणत कामत यांनी यावर जास्त बोलणे टाळले.

मडगावात येऊन सभा किंवा बैठका घेण्यास मी कुणालाही अडवू शकत नाही. मडगावातील मतदारांवर माझा पूर्ण विश्‍‍वास आहे. मतदार आपल्‍याला काय पाहिजे ते करतील. मी सर्व त्यांच्यावर सोडून दिले आहे, असे सांगून कामतांनी सरदेसाईंना टोला लगावला.

दरम्‍यान, मडगाव मतदारसंघातून सलग आठवेळा निवडून येण्याचा पराक्रम केलेले दिगंबर कामत यांचे नाव न घेता विजय सरदेसाई यांनी ‘मडगाव कोलमडू लागले आहे. येथील विकासकामांचे प्राधान्यक्रम चुकीचे आहेत, अशी टीका केली होती. त्यावर, कोणाला काय म्हणायचे आहे ते त्यांना म्हणू द्या. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. माझ्या मतदारांना काय हवे आहे याची मला जाणीव आहे. मी त्यांना हवे तेच निर्णय घेतलेले आहेत, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Vijay Sardesai, Digambar Kamat
Devendra Fadnavis To Rohit Sharma : देवेंद्र फडणवीसांनी रोहित शर्माला सांगितला राजकारणातील 'डकवर्थ लुईस' नियम..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com