Indian Army Agniveer : मोदी सरकारच्या 'अग्निवीर' योजनेतून अपेक्षाभंग ? तरुण अर्ध्यातूनच सोडताहेत प्रशिक्षण ?

Agniveer Traning : केंद्र सरकारने भारतीय तरुणांचे सैन्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अग्निवीर योजनेची घोषणा केली होती
Indian Army Agniveer :
Indian Army Agniveer : Sarkarnama
Published on
Updated on

Agniveer Traning : केंद्र सरकारने भारतीय तरुणांचे सैन्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अग्निवीर योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार, सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे तरुण वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहे.पहिल्या बॅचचे प्रशिक्षण संपले असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

अग्निवीर (Agniveer Scheme) म्हणून भारतीय सैन्यात दाखल झालेले अनेक तरुण प्रशिक्षण अर्धवट सोडून जात असल्याची माहिती समोर आली आहे.वेगवेगळी कारणे सांगून हे तरुण प्रशिक्षण अर्धवट सोडून तरुण जात आहेत. अशा प्रशिक्षण अर्धवट सोडून जाणाऱ्या तरुणांवर लष्कराकडून कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी लष्कराने या तरुणांवर खर्च केलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार असल्याचे लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रशिक्षण अर्धवट सोडणाऱ्यांसाठी कोणताही नियम नाही.पण तोपर्यंत प्रशिक्षणावर झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा, असा विचार लष्कर करत आहे.

प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडताना वेगवेगळी कारणे देत आहेत. त्यातील काहीजणांनी ३० दिवस किंवा त्याहून अधिक दिवस वैद्यकीय रजा घेतल्यामुळे प्रशिक्षणातून बाहेर फेकले गेले आहेत.तर असेही काही तरुण आहेत ज्यांना दुसरीकडे उत्तम संधी मिळाल्याने त्यांनी अग्निवीरचे प्रशिक्षण सोडून दिले आहे. तर,पहिल्या बॅचमध्येच 50 हून अधिक तरुणांना इतरत्र नोकरीची संधी मिळाल्याने त्यांनी प्रशिक्षण अर्धवट सोडल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक अग्निवीरला दरमहा सुमारे 30 हजार रुपये पगार मिळू लागतो. (National News)

अग्निवीरचे प्रशिक्षण सहा महिन्यांचे असते, त्यानंतर अग्निवीर सैन्याचा भाग बनतो. पण अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये असा कोणताही नियम नाही की, अग्निवीरचे प्रशिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी काय करता येईल. (National News) असा अद्याप कोणताही नियम भरतीच्या नियमांमध्ये नाही. जर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मध्येच सोडून गेले तर तोपर्यंत त्यांच्यावर झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल केला जातो

Indian Army Agniveer :
Uddhav Thackeray News: आज माझ्याकडे पक्ष नाही, पण...; उद्धव ठाकरेंचं पोहरादेवी गडावरून भावनिक आवाहन

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "पूर्वी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न असायचे. युवकांच्या देशसेवेच्या संकल्पाचा आदर करून त्यांना चांगल्या सुविधा आणि नोकरीची सुरक्षा देण्यात आली. अग्निवीर योजनेचा पायाच चुकीचा आहे. त्यामुळे तरुणांच्या देशसेवेच्या स्वप्नांचा चुराडा झाला असून विविध शंका निर्माण झाल्या आहेत. निकाल समोर आहे. " असं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com