Karnataka's Giant Killer's: आरोग्य मंत्री, माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांना धूळ चारणारे कर्नाटकातील ‘जायंएट किलर’!

Karnataka Assembly Elections Result: चिक्कमंगळूर मतदारसंघात भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांचा काँग्रेसचे एच. डी. तम्मया यांनी पराभव केला असून, माजी मंत्री असलेल्या रवी यांचा पराभव होईल असे कोणालाही वाटले नव्हते.
Karnataka's Giant Killer's
Karnataka's Giant Killer'sSarkarnama
Published on
Updated on

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अनेक नवख्या उमेदवारांनी विद्यमान मंत्री, दिग्गज नेत्यांना चारीमुंड्या चित केले आहे. काँग्रेसचे सर्वांत तरुण उमेदवार प्रदीप ईश्वर यांनी भाजपचे दिग्गज नेते आणि आरोग्य मंत्री के. सुधाकर यांचा दणदणीत १० हजार मतांनी पराभव करत जायंएट किलर ठरले आहेत. त्यांचा विजय राज्यात सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव करणारे भाजपचे महेश टेंगिनकाई हेही चर्चेत आहेत. प्रतिष्ठित राजकारण्यांना पराभवाचा धक्का देणाऱ्या जायंएट किलरची राज्यभर चर्चा सुरू आहे. (Discussion of candidates who have become 'Giant Killer' in Karnataka Assembly Elections)

कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप, काँग्रेस (Congress) व धजदने अनेक मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे सुरुवातीपासूनच अनेक नव्या उमेदवारांबाबत चर्चा सुरू होती. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या प्रदीप ईश्वर यांनी भाजपचे (Bjp) दिग्गज नेते व आरोग्य मंत्री के. सुधाकर यांना पराभूत करुन संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सुधाकर यांचा आपल्या मतदारसंघात मोठा प्रभाव असताना देखील त्याच मतदारसंघातील प्रदीप यांनी सुधाकर यांचा १०६४२ मतांनी पराभव केला आहे.

Karnataka's Giant Killer's
Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेसचे संख्याबळ एकने घटले; चारवेळा मतमोजणी अन्‌ बरंच काही घडलं...

चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा नेतृत्व केलेल्या जी. एच. तीप्पारेड्डी यांचा पी. वीरेंद्र यांनी पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्यावसाईक असलेल्या विरेंद्र यांनी तब्बल ५२,४५० मतांनी विजय मिळवित आपल्या कडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

धारवाड सेंट्रल मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव करणारे भाजपचे महेश टेंगिनकाई राज्यात चर्चचा विषय ठरले आहेत. कुमार कटील, बी एल संतोष यांच्याशी निकट असलेल्या टेंगिनकाई यांनी पहिल्याच प्रयत्नात राज्यातील दिग्गज नेत्याचा पराभव केला आहे. माजी मंत्री एम. पी. प्रकाश यांच्या कन्या एम. पी. लता यांनी हरपणहल्ली येथे भाजपचे नेते करुणाकरण रेड्डी यांचा पराभव केला आहे.

Karnataka's Giant Killer's
Karnataka Election : मोदी-शहांचा महत्वाकांक्षी ‘गुजरात पॅटर्न’ कर्नाटकात फेल : विद्यमान आमदारांची उमेदवारी कापणे पडले महागात

हरपणहल्ली मतदारसंघातून आमदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांचा रामनगर मतदारसंघात पराभव करणारे इकबाल हुसेन हेही जायंट किलर ठरले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये कुमारस्वामी यांच्या विरोधात इकबाल हुसेन यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या प्रयत्नात ते विधानसभेत पोहोचले आहेत.

चिक्कमंगळूर मतदारसंघात भाजपचे प्रभारी सी. टी. रवी (CT Ravi) यांचा काँग्रेसचे एच. डी. तम्मया यांनी पराभव केला असून, माजी मंत्री असलेल्या रवी यांचा पराभव होईल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागते आहे.

Karnataka's Giant Killer's
Bandal Vs Pawar : खुमखुमी गेली नसेल तर आणखी बरेच विषय आहेत : आमदारकीचा राजीनामा मागणाऱ्या बांदलांना पवारांचा इशारा

बळ्ळारी मतदारसंघात भाजपचे प्रभावी नेते सोमशेखर रेड्डी यांचा भरत रेड्डी यांनी पराभव केला आहे. त्यामुळे राज्यात जायंट किलर ठरलेल्या विजयी उमेदवारांची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तसेच यापैकी काही चेहऱ्यांना मंत्रिमंडळात देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com