Karnataka Election : मोदी-शहांचा महत्वाकांक्षी ‘गुजरात पॅटर्न’ कर्नाटकात फेल : विद्यमान आमदारांची उमेदवारी कापणे पडले महागात

विधानसभा निडणुकीत बेळगावमध्ये भाजप पिछाडीवर राहिली, तर काँग्रेसने मुसंडी मारली.
Karnataka Election Result
Karnataka Election ResultSarkarnama
Published on
Updated on

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महत्वाकांक्षी असलेला भाजपचा गुजरात पॅटर्न बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात फेल ठरला आहे. कर्नाटकातील अनेक विद्यमान आमदार, ज्येष्ठ नेते, मंत्री यांची उमेदवारी कापणे भाजपला महागात पडले आहे. संपूर्ण राज्याप्रमाणेच बेळगवमधील विद्यमान दोघा आमदारांची उमेदवार कापण्यात आली. त्या ठिकाणी नव्यांना उमेदवारांना संधी दिली. मात्र, भाजपचा नवा प्रयोग अपयशी ठरला आहे. भाजप मागे पडली आणि काँग्रेसने बेळगावमध्ये मुसंडी मारली. दरम्यान, आमदार रमेश जारकीहोळी यांनी निकटवर्तीच्या उमेदवारीसाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेही नाराजीचा सूर होता. (Modi-Shah's ambitious 'Gujarat pattern' failed in Karnataka)

विधानसभा निडणुकीत बेळगावमध्ये भाजप (BJP) पिछाडीवर राहिली, तर काँग्रेसने मुसंडी मारली. जिल्ह्यातील १८ पैकी ११ जागांवर काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळविला, तर ७ ठिकाणी भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे. काँग्रेसने २०१८ पेक्षा चार जागा अधिकच्या मिळवत बाजी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देणारा निकाल ठरला आहे.

Karnataka Election Result
Bandal Vs Pawar : खुमखुमी गेली नसेल तर आणखी बरेच विषय आहेत : आमदारकीचा राजीनामा मागणाऱ्या बांदलांना पवारांचा इशारा

कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने गुजरात पॅटर्न (Gujarat pattern') राबविला. वयस्कर आमदार व नाराजी असलेल्या विद्यमान आमदारांची उमेदवारी कापली. बेळगाव जिल्ह्यामध्ये चौघा नवीन चेहऱ्यांना संधी दिली. यात बेळगाव उत्तरला रवी पाटील, सौदत्तीमध्ये रत्ना मामनी, रामदूर्गला चिक्करेवण्णा व बेळगाव ग्रामीणला नागेश मनोळकर यांना उमेदवारी मिळाली होती. या सर्वांचा पराभव झाला आहे.

Karnataka Election Result
Murgesh Nirani News : राहुल कुलांचा ‘भीमा-पाटस’ चालवायला घेतलेल्या कर्नाटकच्या मुरगेश निराणींचा पराभव

बेळगाव उत्तर आणि बैलहोंगलला विद्यमान आमदारांची उमेदवारी कापण्यात आली. बेळगाव उत्तरला आमदार अॅड. अनिल बेनके यांनी २०१८ मध्ये भाजपला विजय मिळवून दिला होता. मात्र, या निवडणुकीमध्ये उमेदवारी कापत त्याजागी डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. तर काँग्रेसकडून येथून माजी आमदार फिरोझ सेठ यांच्याजागी त्यांचे बंधू आसिफ (राजू) शेठ यांना उमेदवारी जाहीर झाली. सर्वाधिक चुरस आणि अखेर फेरीपर्यंत चालेल्या या लढतीत आसिफ शेठ यांनी बाजी मारली. रामदूर्गमध्ये आमदार महादेवप्पा यादवाड यांना उमेदवारी डावलली. चिक्करेवण्णा यांना आखाड्यामध्ये उतरविले. मात्र, तेथे अशोक पट्टण यांनी विजय मिळविला.

Karnataka Election Result
Solapur News : कर्नाटकच्या विधानसभेत पोचले सोलापूरचे दोन भाचे....

विधानसभा निवडणूक तोंडावर उमेदवारीवरून नाराजीनाट्य रंगले. आमदार रमेश जारकीहोळी यांनी ऑपरेशन कमळद्वारे भाजप प्रवेश केलेल्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी अट्टाहास केला. त्यातून उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अथणीतून निवडणूक लढवली. यात महेश कुमठळ्ळी यांचा दारुण पराभव करत सवदी यांनी विजय एकतर्फी केला. कागवाडमध्ये काँग्रेस उमेदवार राजू कागे यांनी माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्यावर मात केली. तसेच यमकनमर्डी, बैलहोंगल, सौदत्तीत बंडखोरी झाली. यामुळे मतांची विभागणी झाली.

Karnataka Election Result
Karnataka Next CM : कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण...? सुशीलकुमार शिंदेंवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

बेळगाव ग्रामीणला नागेश मनोळकर आणि यमकमर्डीत मारुती अष्टगी यांना डावलून बसवराज हुंदरी यांना उदवारी घोषित झाली. मात्र दोन्ही ठिकाणी उमेदवार पराभूत झाले. यामुळे एकीकडे उमेदवारीचा घोळ आणि दुसरीकडे मतांची विभागणीमुळे भाजप पिछाडीवर राहिला. तर काँग्रेस पक्षाने आघाडी घेऊन विजय मिळविले. शिवाय उमेदवारी कापण्यात आल्यामुळे विद्यमान आमदारांचे समर्थकांत नाराजीचा सूर उमटला. त्याचाही फटका भाजपला बसल्याचे मानले जाते. एकंदरीत भाजपच्या नव्या प्रयोगामुळे मतांची विभागणी झाली. त्यामुळे काँग्रेसने उमेदवारांनी बाजी मारली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com