D.K. Shivakumar News: डी.के.शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; व्हिडिओ व्हायरल...

Karnataka News: डी.के.शिवकुमार हे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते एसएम कृष्णा यांच्या पाया पडले.
D.K. Shivakumar Viral Video
D.K. Shivakumar Viral VideoSarkarnama

Karnataka Politics: कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जांगावर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर डी.के.शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कर्नाटकात काँग्रेसला 135 जागा जिंकून आणण्यात डी.के.शिवकुमार यांचे मोलाचे योगदान आहे. डी.के.शिवकुमार हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.

D.K. Shivakumar Viral Video
Jayant Patil ED Enquiry News : जयंत पाटील दोन पुस्तकं घेऊन ईडी कार्यालयात; काय आहे कारण?

सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज सरकारचं पहिलं सत्र सुरू झालं. मात्र, त्याआधी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या व्हिडिओची कर्नाटकमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

डी.के.शिवकुमार हे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते एसएम कृष्णा यांच्या पाया पडले आहेत. शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत एसएम कृष्णा यांचे आशीर्वाद घेतले. याआधी शिवकुमार यांनी विधानसभेत प्रवेश करण्याआधी सभागृहाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं होतं. त्यामुळे त्यांची सध्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले 224 आमदार शपथ घेणार आहेत. त्याबरोबरच सभागृहाच्या नवीन अध्यक्षांची देखील निवड करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com