Jayant Patil ED Enquiry News : जयंत पाटील दोन पुस्तकं घेऊन ईडी कार्यालयात; काय आहे कारण?

Jayant Patil ED Summons : जयंत पाटील आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर झाले.
Jayant Patil News
Jayant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

ED inquiry of Jayant Patil : आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील यांना ईडीने समन्स पाठवले होते. त्यानुसार जयंत पाटील आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर झाले.

ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, ईडीने बोलावले म्हटल्यानंतर जाऊन त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं देणार आहे. आयएल अॅण्ड एफएसच्या संबंधीत माझा कुणाशीही कधीही संपर्क आलेला नाही. माझा या कंपन्यांशी काहीही संबंध नाही, असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Jayant Patil News
Chhagan Bhujbal News : लॉन्ड्रीमध्ये गुजरातहून आणलेली धुलाई पावडर; छगन भुजबळ, जयंत पाटलांच्या चौकशीवर थेटच बोलले

जे काही असेल त्याला समोरे जाणे हे आपले काम आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, त्यांनी आक्रमक होऊ नये. मला फक्त चौकशीसाठी बोलावले आहे. मी प्रश्नांची उत्तर देण्यासाठी जात आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. महाविकास आघाडी एकत्रीतच आहे. त्यामध्ये काहीच अडचण नाही. माझ्याकडे काही नाही, मी दोन पुस्तकं वाचायला घेऊन चाललो आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

पुस्तकं घेऊन चालला आहात म्हणजे तुम्ही मुक्कामाच्या दृष्टीने चालला आहात का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, ते जेव्हा-जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा उत्तर द्यायची असतात, असे मला अनुभवी लोकांकडून सांगण्यात आले. आज माला माझे कुणाशीही बोलणे झाले नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Jayant Patil News
Jayant Patil ED Enquiry: राष्ट्रवादीकडून 'ईडी'चा निषेध; 'जयंत पाटील स्वच्छ प्रतिमेचे नेते...'

दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन केले जात आहे. इस्लामपूरचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर ईडी आणि भाजापविरोधात आंदोलन केले. पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात येत असून त्यांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरबाजीही करण्यात आली आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com