Rich Vs Poor MLA : आता तुम्हीच बघा ! सर्वात श्रीमंत आमदाराकडे हजारो कोटी तर गरीब आमदाराच्या खात्यावर...

Top Rich MLA And Poor MLA In India : 'एडीआर'च्या अहवालातून आमदारांच्या संपत्तीची माहिती जाहीर
D.K Shivkumar, Nirmal Kumar Dhara
D.K Shivkumar, Nirmal Kumar DharaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : देशातील सर्वात श्रीमंत आमदाराकडे एक हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे, तर पश्चिम बंगालच्या एका आमदाराच्या नावावर दोन हजार रुपयेही नाहीत. 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर)चा प्रसिद्ध झालेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. (Latest political News)

मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचंड विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री बनलेले डी. के. शिवकुमार यांच्याकडे तब्बल एक हजार ४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यानंतरचे दोन श्रीमंत आमदारही कर्नाटकातील आहेत. अपक्ष आमदार असलेले के. एच. पुट्टास्वामी गौडा हे एडीआरच्या श्रीमंत आमदारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे एक हजार २६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या खालोखाल काँग्रेसच्या प्रिया कृष्णा असून त्यांची संपत्ती एक हजार १५६ कोटी आहे.

D.K Shivkumar, Nirmal Kumar Dhara
Sangli Politics : जयंत पाटलांच्या सांगलीत राडा, फडणवीस - अजितदादांच्या नगरसेवकांत हमरीतुमरी

'एडीआर'च्या अहवालानुसार सर्वात श्रीमंत १० आमदारांपैकी चार काँग्रेसचे आणि तीन भाजपचे आहेत. सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत २३ व्या क्रमांकावर खाण उद्योगपती जनार्दन रेड्डी आहेत. रेड्डी पूर्वी भाजपमध्ये होते आणि गेल्या वर्षी त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांची बहुतेक संपत्ती त्यांच्या पत्नी अरुणा लक्ष्मीच्या नावावर आहे. रेड्डी यांनी नवीन पक्ष कल्याण राज्य प्रगती पक्षाच्या बॅनरखाली कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवली होती.

राजकारण्यांच्या श्रीमंतीच्या यादीत सर्वात खालच्या टोकाला पश्चिम बंगालचे भाजप आमदार निर्मल कुमार धारा आहेत. त्यांनी आपली एकूण घोषित केलेली संपत्ती फक्त एक हजार ७०० रुपये आहे. त्यांच्या खालोखाल ओडिशातील अपक्ष आमदार मकरंदा मुदुली यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती १५ हजार रुपये आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे आमदार नरिंदर पाल सिंग सावना यांची संपत्ती १८ हजार ३७० रुपये आहे.

D.K Shivkumar, Nirmal Kumar Dhara
BJP Distirct President News : मुरकुटे जिल्हाध्यक्ष होताच गुट्टे समर्थक भडकले..

देशातील २० श्रीमंत आमदारांपैकी १२ आमदार कर्नाटकातील आहेत. राज्यात सर्वाधिक १४ टक्के आमदार अब्जाधीश आहेत. यांच्याकडे किमान १०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. राज्यांच्या श्रीमंत आमदारांच्या यादीत अरुणाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यातील ५९ पैकी चार आमदार अब्जाधीश आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com