PM Modi Degree News : आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) न्यायाधीश बीरेन वैष्णव यांनी हा निर्णय़ दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची शैक्षणिक पदवी मागितल्या प्रकरणी त्यांना हा दंड ठोठावला असून, पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांची शैक्षणिक पदवी सादर करण्याची गरज नाही, असंही सांगितलं आहे. आता यावर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अरविंद केजरीवाल संतप्त झाल्याचे दिसून येत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा त्यांनी निषेधही व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींची शैक्षणिक माहितीचा पाठपुरावा केल्याबद्दल, याबाबत माहिती अधिकारातून माहिती मागवल्यामुळे, उच्च न्यायालयाने त्यांना २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. (Don people have right to know how educated their PM is Arvind Kejriwal after Gujarat HC order)
उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबतची बातमी शेअर केजरीवालांनी शेअर केली आहे. केजरीवालांनी ट्वीट करून एक सवाल विचारला आहे. देशातील लोकांना आपले पंतप्रधानांचं शिक्षण किती आहे? याची माहिती घेण्याचा अधिकार नाही का? एखाद्याने जर पंतप्रधान यांच्या शैक्षणिककागदपत्रांची, त्यांच्या पदवीची मागणी केली तर, यात चुकीचं काय आहे? अडाणी किंवा कमी शिकलेला पंतप्रधान हा देशासाठी घातक असतो, असेही केजरीवालांनी म्हंटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.