Sarkarnama Podcast : मराठी मनात चैतन्य फुलवण्याऱ्या 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताचा इतिहास काय?

Jai Jai Maharashtra Majha Song : महाराष्ट्र गीत कुणी लिहले? हे गीत केव्हा गायले गेले? आत्ताच याला राज्यगीताचा दर्जा का?
Sarkarnama Podcast : Jai Jai Maharashtra Majha Song :  Maharashtra Song : Maharashtra anthem
Sarkarnama Podcast : Jai Jai Maharashtra Majha Song : Maharashtra Song : Maharashtra anthemSarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Podcast : १९ फेब्रुवारी २०२३ ला महाराष्ट्राला स्वतःचं राज्य गीत मिळालं. अंगात चैतन्य फुलवणाऱ्या या गीताचा इतिहास काय आहे? हे गाणे कुणी लिहले? तसेच हे गीत केव्हा गायले गेले? तसेच या गीताला आत्ताच राज्यगीताचा दर्जा का देण्यात आला? याविषयी सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात. (Maharashtra Anthem)

'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं आहे. श्रीनिवास खळे यांचं संगीत या गाण्याला आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. यावेळी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गीत गायले होते.

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत उत्साह आणि प्रेरणा देणारे गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये देखील एक उर्जा आहे. सध्या देशातील 11 राज्यांचे स्वत:चे गाणे आहे. यामध्ये आता महाराष्ट्राला देखील स्वत:चं गीत मिळालं आहे. राज्यातल्या शासकीय कार्यक्रमांत आता सुरुवातीला हे गीत आणि शेवटाला राष्ट्रगीत गायलं जातं, अशी प्रथा आहे.

Sarkarnama Podcast : Jai Jai Maharashtra Majha Song :  Maharashtra Song : Maharashtra anthem
Sarkarnama Podcast: विरोधी ऐक्‍याचा गुंता

जाऊन घेऊ या गीताच्या वाटचालीबद्दल :

काय होतं हे मूळ गीत?

राजा निळकंठ बढे यांनी लिहिलेल्या मूळ गीतामध्ये जी चार चरणं होती, ही चार चरणं अशी होती;

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा

निळे निळे आकाश झाकते या पावन देशा

तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी

उत्तर दक्षिण वारे पाऊस वर्षविती भूवरी

रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

गर्जा महाराष्ट्र माझा....

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभो राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र माझा...

गलमुच्छे पिळदार मिशीवर उभे राहते लिंबू

चघळत पाने पिकली करिती दो ओठांचा चंबू

मर्द मराठा गडी ओढतो थंडीची गुडगुडी

ठसक्याची लावणीतही ठसकदार गुलछडी

रंगरंगेला रंगेल मोठा करीतो रणमौजा

गर्जा महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

निढळाच्या घामाने भिजला

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र माझा

या गीतात शाहीर साबळेंनी बदल करुन तीन चरणांचं गीत गायलं. ३१ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र शासनानं या गीतावर संस्करण करुन दोन चरणांचं गीत महाराष्ट्र राज्यगीत म्हणून जाहीर केलं. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगीकारण्यात आलं

Sarkarnama Podcast : Jai Jai Maharashtra Majha Song :  Maharashtra Song : Maharashtra anthem
Sarkarnama Podcast : अनाथ आदिवासी मुलीच्या अत्याचाराची करूण कथा, ज्यामुळे बलात्कार कायद्यात झाले बदल!

हे नवं गीत असं आहे...

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभो राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा...गर्जा महाराष्ट्र माझा...

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

निढळाच्या घामाने भिजला

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा...गर्जा महाराष्ट्र माझा

Sarkarnama Podcast : Jai Jai Maharashtra Majha Song :  Maharashtra Song : Maharashtra anthem
Sarkarnama Podcast : जेव्हा छगन भुजबळ इक्बाल शेख झाले तेव्हा!

मराठी शाहीर आणि लोकनाट्य कलावंत अशी शाहीर साबळे यांची ओळख होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून शाहीर साबळे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. शाहीर साबळे यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आता शाहीरांचे नातू प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट आणले आहे. त्यातून या गीताला जिवंत करणाऱ्या थोर शाहीराची माहिती तरुणांना होईलच. महाराष्ट्र शासनानं तरुणांना प्रेरणा देण्यासाठी उशीरा का होईना पण योग्य गाणं निवडलंय हे मात्र इथं मान्य करावं लागेल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com