Trump Vs Putin : संतापलेल्या ट्रम्प यांचा पुतीन यांना झटका; 2 मोठ्या घोषणा, रशियाने उडवली खिल्ली...

Russia Ukraine war : यूक्रेनसोबत शस्त्रसंधीसाठी टाळाटाळ करणाऱ्या रशियाविरोधात ट्रम्प आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट यूक्रेनला 17 एअर डिफेन्स सिस्टीम पाठविण्याची घोषणा केली आहे. तसेच यूक्रेनला आणखी मदत केली जाऊ शकते.
Putin vs Trump
Putin vs TrumpSarkarnama
Published on
Updated on

Donald Trump Move : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला मोठा झटका दिला आहे. युक्रेनसोबत शस्त्रसंधीसाठी टाळाटाळ करणारे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या धोरणामुळे ट्रम्प चांगलेच संतापले आहेत. त्यांनी पुतीन यांना अल्टिमेटम देत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, या अल्टिमेटमची रशियाने खिल्ली उडवली आहे.

यूक्रेनसोबत शस्त्रसंधीसाठी टाळाटाळ करणाऱ्या रशियाविरोधात ट्रम्प आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट यूक्रेनला 17 एअर डिफेन्स सिस्टीम पाठविण्याची घोषणा केली आहे. तसेच यूक्रेनला आणखी मदत केली जाऊ शकते. ट्रम्प यांनी सोमवारी ही घोषणा नाटोच्या महासचिवांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये केली होती.

यूक्रेनला एअर डिफेन्स सिस्टीमची गरज असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी रशियाला दुसरा मोठा इशारा दिला आहे. रशियाने पुढील ५० दिवसांत शस्त्रसंधीबाबत सहमती न दर्शविल्या 100 टक्के टेरिफ लावला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही टेरिफ लावण्याचे संकेत त्यांनी दिले. यामध्ये भारताचाही समावेश आहे.

Putin vs Trump
Nimisha Priya’s Case : मोठी बातमी : निमिषा प्रिया यांची उद्याची फाशी टळली; भारताला मोठं यश, नेमकं काय घडलं?

मागील काही वर्षांपासून यूक्रेन आणि रशियामध्ये संघर्ष सुरू आहे. यूक्रेनला नाटोचा सदस्य होण्यापासून रोखण्यासाठी रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी यूक्रेनवर हल्ला केला होता. त्याला यूक्रेनकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संघर्ष अधिकच वाढला आहे. रशियाने आतापर्यंत यूक्रेनच्या 20 टक्के भूभागावर कब्जा केल्याचेही सांगितले जाते.

ट्रम्प यांच्याकडून दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी यूक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांची भेटही घेतली होती. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार व्हावा, यासाठी ते आग्रही आहेत. दरम्यान, रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी ट्रम्प यांच्या धमकीची खिल्ली उडवली आहे.

Putin vs Trump
Gadkari vs Siddaramaiah : सिध्दरामय्याजी, तुम्ही या! गडकरींकडून पुराव्यांसह पोलखोल, मुख्यमंत्र्यांनी थेट केली मोदींकडे तक्रार

मेदवेदेव यांनी सोशल मीडियात पोस्ट करत ट्रम्प यांच्या अल्टीमेटमला नाटकी म्हटले आहे. रशिया त्याची पर्वा करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पुतीन यांच्याकडून ट्रम्प यांना कसे प्रत्युत्तर दिले जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com