Kapil Sibal On PM Modi's 'Supari' Remark: कपिल सिब्बल पंतप्रधान मोदींसाठी मैदानात? म्हणाले 'त्या' लोकांची नावं सांगा आपण त्यांच्यावर...

Narendra Modi News : ज्येष्ठ वकिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबात एक ट्वीट केले आहे.
Kapil Sibal, Narendra Modi News
Kapil Sibal, Narendra Modi NewsSarkarnama

Kapil Sibal, Narendra Modi News : ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबात एक ट्वीट केले आहे. सिब्बल यांच्या ट्वीटची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधक रचत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सिब्बल यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हटले आहे, की तुमची प्रतिमा मलिन करणाऱ्यांची नावे सांगा, आपण त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करु, असे ट्वीट त्यांनी केले.

Kapil Sibal, Narendra Modi News
Karnataka Congress : कर्नाटक काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; पहिल्या यादीवरून शिवकुमारांना घेरले

भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता. 'काही लोकांनी शपथ घेतली आहे, की ते मोदींची प्रतिमा डागाळत आहेत. यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना सुपारी दिली. त्यांना आधार देण्यासाठी काही लोक देशात काम करत आहेत तर काही देशाबाहेरही आहेत.

हे लोक सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोदींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आज भारतातील गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित, तसेच प्रत्येक भारतीय मोदींचे सुरक्षा कवच बनले आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर सिब्बल यांनी ट्विट केले.

Kapil Sibal, Narendra Modi News
Ashok Chavan News : भाजप अन् शिवसेनेच्या डावाने काँग्रेस नेत्यांवर खुलासे करण्याची वेळ; चव्हाणांच्या भोवतीच संशयाचे जाळे का?

सिब्बल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'मोदी सांगत आहेत की, त्यांना बदनाम करण्याचा कट देशासह परदेशातही रचला जात आहे.' त्यामुळे मला व्यक्ती, संस्था आणि कोणत्या देशात तुमच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे, त्यांची नावे सांगा. हे गुपित राहू शकत नाही. आपण त्यांच्यावर खटला चालवू.' असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com