US Presidential Election News : अमेरिकेतील कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने ट्रम्प यांना 2024 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले आहे. कोलोरॅडो न्यायालयाने मंगळवारी 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या कॅपिटल हिंसाचार प्रकरणाच्या अनुषंगाने ट्रम्प यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. (Latest Marathi News)
न्यायालयाच्या निर्णयामुळे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे अध्यक्षीय उमेदवार आहेत ज्यांना अमेरिकेच्या घटनेच्या फारच विरळ वेळा वापरल्या जाणार्या तरतुदीनुसार अपात्र ठरवण्यात आले आहे.
अमेरिकेच्या राज्यघटनेची ती तरतूद 'बंड किंवा बंडखोरी' मध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला राष्ट्राध्यक्ष पद धारण करण्यापासून प्रतिबंधित करते. अमेरिकेच्या राज्यघटनेच्या 14 व्या दुरुस्तीच्या कलम 3 अंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाने असा निष्कर्ष नोंदवला आहे की, अमेरिकेच्या राज्यघटनेच्या तरतुदींनुसार अमेरिका सरकारच्या विरोधात कॅपिटल हिलचा हिंसाचार भडकावण्याच्या कारस्थानामुळे ट्रम्प यांना 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जात आहे. या पदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांमध्ये ट्रम्प यांचे नाव आघाडीवर होते.
ट्रम्प यांना अपात्र ठरवले असले तरी, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी ४ जानेवारीपर्यंत थांबवली आहे. यामुळे ट्रम्प या निर्णयाविरोधात आणखी अपील करू शकतात. मिनेसोटा आणि मिशिगनच्या न्यायालयांनी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या नियुक्तीला आव्हान देणारे असेच खटले नाकारले आहेत, परंतु या मुद्द्यावर अनेक राज्यांमध्ये खटले सुरू आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.