Israel-Hamas War : इस्राईलच्या पाठीशी अमेरिका, तर रशिया पोहाेचला गाझापट्टीत; महाशक्तींमध्ये 'शीतयुद्ध'

Israel-Hamas War : जगभरातील महासत्तांच्या वाढत्या कुरघोड्यांमुळे जागतिक राजकारण ढवळून निघत आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarSarkarnama
Published on
Updated on

Israel-Hamas War : रशिया-युक्रेन युद्धानंतर इस्राईल-हमास युद्धातही जगभरातील देशांनी आपली भूमिका घेतली आहे. जिथे इस्राईलने हमासचा नायनाट करण्याचा चंगच बांधला आहे. त्याचवेळी महासत्ता अमेरिकाही त्याला पाठिंबा देत आहे. हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायली लोकांच्या सुरक्षिततेसाठी जो बायडेन प्रयत्नशील आहेत, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

आता या सगळ्या प्रकरणावर चीनची भूमिकाही समोर आली आहे. गाझामधील पॅलेस्टिनींना मदत करण्यासाठी रशियासोबत काम करण्यास आपणही तत्पर असल्याचे सांगितले. आता जगभरातील महासत्तांच्या वाढत्या कुरघोड्यांमुळे जागतिक राजकारण ढवळून निघत आहे. (Latest Marathi News)

Israel-Hamas War
Israel Hamas War News : 'हमास'चं समर्थन करणाऱ्या इराणला अमेरिकेचा 'दे धक्का'; नव्या निर्बंधांची घोषणा!

यूएस स्टेट विभाग प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "अमेरिका केवळ इस्रायलला हमासच्या विरोधी कारवाया करण्यांमध्ये पाठिंबा देणार नाही, तर गाझाला मानवतावादाच्या भूमिकेतून मदत पोहोचविण्यासदेखील तयार आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतेच इस्राईलला भेट दिली होती.

रशिया आणि चीन एकत्र -

इस्राईल-हमास युद्धावर रशिया आणि चीन यांची भूमिका सारखीच दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रशिया-युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील वैर वाढले आहे. त्याचबरोबर दक्षिण चीन समुद्रातील वर्चस्वाच्या बाबतीत चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंधही सहज राहिले नाहीत. दोन्ही देश पॅलेस्टाईनच्या निमित्ताने अमेरिकेला उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Israel-Hamas War
Putin Drone Strike : ड्रोनहल्ल्यातून थेट पुतीनच्या घरावर स्फोट; रशिया देणार जशास तसे प्रत्युत्तर?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्ष शांत करण्यासाठी चीन रशियाशी चर्चा करण्यास आणि समन्वय राखण्यास तयार असल्याचे चिनी माध्यमांनी वृत्त दिले आहे. चीनचे मध्यपूर्व विशेष दूत आणि त्यांचे रशियन अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हा अहवाल समोर आला आहे. कतारमधील दोहा येथे रशियासोबत झालेल्या बैठकीनंतर राजदूत झाय जून यांनी सांगितले की, पॅलेस्टिनी प्रश्नावर चीन आणि रशियाची भूमिका सारखीच आहे.

इस्राईलसोबत ब्रिटनही, सुनक यांनी तेल अवीवला भेट दिली -

इस्राईल-हमास संघर्ष शमवण्यासाठी आणि इस्राईलला पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक गुरुवारी तेल अवीव येथे पोहोचले. येथे सुनक यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना या कठीण काळात इस्राईलसोबत असल्याचे वचन दिले. गाझामध्ये कॉरिडॉर सुरू करण्याचेही त्यांनी स्वागत केले.

“मला सांगायचे आहे की, इस्राईलच्या सर्वात कठीण काळात सोबत उभे राहिल्याचा मला अभिमान वाटतो. तुमचे मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू. तुमचा विजय व्हावा अशी आमची इच्छा आहे. या भयंकर काळात युद्धाच्या ठिकाणी अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो, असेही सुनक म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com