
Trump India 25% tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवर नवे कर लादण्याचा निर्णय अखेर आजपासून अंमलात आणला आहे. नव्या टॅरिफ धोरणावर त्यांनी स्वाक्षरी करत 10 ते 41 टक्क्यांपर्यंतच्या कर लादण्याचा आदेश जारी केला आहे.
नव्या टॅरिफनूसार भारतातून होणाऱ्या निर्यातीवर तबब्ल 25% टॅरिफ लागू करण्यात आला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नसल्याचे स्पष्ट केलं होतं.
मात्र, त्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी आपणच युद्ध थांबवण्यासाठी सांगितल्याचा दावा पुन्हा केला. त्यानंतर लगेचच भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. यावर भारताचे निर्यात संघटनेचे महासंचालक अजय सहाय यांनी ट्रम्प यांच्या घोषणेनंतर त्यांनी दंड आकारणार असं म्हटलं असलं तरी ते नेमकं काय करणार हे स्पष्ट नाही.
शिवाय 25 टक्के शुल्क आकारणं निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नवी टॅरिफ प्रणाली लागू केली आहे. तर या निर्णयामुळे अमेरिकेला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापारातील असमतोलही दूर होईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, व्हाईट हाऊसने जारी केलेल्या पत्रकानुसार नवीन टॅरिफ दर 1 ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. त्यानुसार आता भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 25% तर पाकिस्तानवर 19 टक्के आणि जपानवर 15 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. तसंच इस्रायल 15 टक्के, इराक 35 टक्के, दक्षिण आफ्रिका 30 टक्के, दक्षिण कोरियावर 15 टक्के आणि श्रीलंकेवर 20 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे.
यासह, इराक 35%, इस्राइल 15%, जपान 15%, जॉर्डन 15% अल्जेरिया - 30%, अंगोला -15%, बांगलादेश - 20%, बोलिव्हिया - 15%, बोस्निया आणि हर्जेगोविना - 30%, बोस्निया आणि हर्जेगोविना - 15%, बोत्स्वाना - 15%, ब्राझील - 10%, ब्रुनेई - 25%, कंबोडिया -19%, कॅमेरून - 15%
इक्वेडोर 15%. इक्वेटोरियल गिनी 15%, घाना - 15%,दक्षिण कोरिया - 15%, श्रीलंका - 20%, स्वित्झर्लंड - 39%, सीरिया 41%, तैवान 20%, थायलंड 19%,तुर्की 15%, व्हिएतनाम - 20%, झिम्बाब्वे - 15%, गयाना 15%, आइसलँड 15%, भारत 25%, इंडोनेशिया 19%, कझाकस्तान - 25%, लाओस 40%, लेसोथो 15%, लिबिया 30%, लिक्टेंस्टाइन - 15%,म्यानमार 40%, नामिबिया 15%, नौरू 15%, न्यूझीलंड 15%, निकाराग्वा 18%, नायजेरिया 15%, मादागास्कर - 15%, मलावी 15%, मलेशिया 19 टक्के असा कर लादला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.