Donald Trump Tariff : ट्रम्प बॅकफूटवर? अमेरिकेतील महागाईचा फटका; भारताच्या 'या' वस्तूंवरचा 50% टॅरिफ रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

President Trump Tariff Removal on Key Indian Goods : अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे ट्रम्प सरकारने भारताच्या अनेक वस्तूंवरील 50% टॅरिफ रद्द केले आहे. या निर्णयामुळे भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महागाईचा दबाव आणि वाढत्या टीकेमुळे अखेर मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतासाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरणार आहे. दोन्ही देशांमधील टॅरिफ (आयात शुल्क) धोरणांमध्ये सुरू असलेल्या वादविवादा दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने सुमारे 200 खाद्यपदार्थ, कृषी उत्पादने आणि फार्म उत्पादनांवरून टॅरिफ हटवले आहेत. या निर्णयामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी निर्यातदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी, अमेरिकेने काही भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क (टॅरिफ) वाढवून 50% पर्यंत केले होते. याचा मोठा फटका चहा, कॉफी, मसाले आणि काजू यांसारख्या वस्तूंच्या भारतीय निर्यातदारांना बसला होता. तसेच, युरोपियन युनियन आणि व्हिएतनामी पुरवठादारांवर 15-20% शुल्क लागू असताना, भारतीय मालावर अधिक शुल्क लावण्यात आले होते.

निर्यात वाढण्याची अपेक्षा

टॅरिफ हटवण्याच्या या निर्णयामुळे भारतीय कृषी निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, यामुळे अमेरिकेतील भारतीय उत्पादनांची कमी झालेली मागणी पुन्हा वाढण्यास मदत मिळेल. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महानिदेशक अजय सहाय यांनी सांगितले की, या टॅरिफमधून मिळालेल्या सूटमुळे भारताच्या 2.5 अब्ज डॉलर ते 3 अब्ज डॉलर इतक्या मूल्याच्या निर्यातीला फायदा होण्याची शक्यता आहे.

Donald Trump
Mahayuti Govenrment Scheme : ऐन निवडणुकीत महायुतीचं 'हुकमी अस्त्रं'! लाडकी बहीण योजनेनंतर आता नवी योजना, कोणाला होणार फायदा?

50 हून अधिक प्रोसेस्ड फूड कॅटेगरी फायदा घेणार

माहितीनुसार, सुमारे 50 प्रकारच्या प्रोसेस्ड फूड कॅटेगरीना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. गेल्या वर्षी या कॅटेगरींतून 491 मिलियन डॉलर मूल्याचे उत्पादने भारतातून अमेरिकेत गेली. यात फळांचे रस, कोको-आधारित उत्पादने, कॉफी-चहा अर्क, आंब्याचे पदार्थ आणि भाजीपाला, वॅक्स यांचा समावेश आहे. नारळ, अमरूद, आंबा, सुपारी, अननस यांसारख्या फळे आणि मेव्यांनाही टॅरिफ कमी झाल्यामुळे निर्यातीचा मार्ग आणखी मोकळा होईल.

Donald Trump
Sharad Pawar NCP Aspirant : शरद पवारांच्या पक्षाच्या इच्छुकाचा 'इंटरनॅशनल' जुगाड; निवडणुकीसाठी थेट वर्ल्ड बँकेकडे 30 कोटींच्या कर्जाची मागणी!

या निर्णयामुळे आता भारत आणि अमेरिका यांच्यातील आगामी व्यापार चर्चा अधिक सकारात्मक वातावरणात होण्याची शक्यता आहे. भारतीय शेतकरी आणि उत्पादनांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com