Sharad Pawar NCP Aspirant : शरद पवारांच्या पक्षाच्या इच्छुकाचा 'इंटरनॅशनल' जुगाड; निवडणुकीसाठी थेट वर्ल्ड बँकेकडे 30 कोटींच्या कर्जाची मागणी!

Sharad Pawar NCP aspirant loan request to World Bank election loan : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत मोठा धक्का! शरद पवारांच्या पक्षाच्या इच्छुकाने निवडणुकीसाठी थेट वर्ल्ड बँकेकडे 30 कोटींच्या कर्जाची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
Sharad Pawar NCP aspirant
Sharad Pawar NCP aspirantSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी वेळी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाल्याच बोललं जातं. तसेच बिहार निवडणुकीमध्ये देखील दहा हजार रुपये निवडणुकीपूर्वी महिलांना देण्यात आले त्यामुळे बिहारमध्ये देखील महायुतीचा विजय झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका इच्छुकाने महिलांना पैसे वाटप करण्यासाठी थेट जागतिक बँकेकडे खर्चाची मागणी केली आहे. माधव पाटील हे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत.ते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

दरम्यान माधव पाटील यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांना पत्र पाठवून आपल्याला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महिलांना पैसे वाटप करण्यासाठी कर्ज द्यावी अशी मागणी केली आहे.

Sharad Pawar NCP aspirant
Mahayuti Govenrment Scheme : ऐन निवडणुकीत महायुतीचं 'हुकमी अस्त्रं'! लाडकी बहीण योजनेनंतर आता नवी योजना, कोणाला होणार फायदा?

महिला मतदारांना पैसे दिल्यानंतर निकाल त्यांच्या बाजूने लागतात हे बिहार आणि महाराष्ट्र या दोन्ही निवडणुकांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे. आपण देखील पैसे वाटल्यानंतर आपला विजय निश्चित होईल असा विश्वास असल्याने आपल्या मतदारसंघातील 30000 महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये निवडणुकीपूर्वी वाटप करण्यासाठी 30 कोटींची आवश्यकता असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आला आहे.

महिलेकरिता १०,००१ रुपये देऊ इच्छितो तेही केवळ निवडणूक फायदेशीर ठरावे म्हणून नाही, तर महिलांच्या आर्थिक प्रगती आणि सक्षमीकरणासाठी दीर्घकालीन कामाची सुरुवात म्हणून देण्याचे असून हे आपल्याच दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

Sharad Pawar NCP aspirant
PM Kisan Yojana : 21व्या हप्त्यासाठी काउंटडाऊन सुरू! फक्त 24 तासांत जमा होणार 2000! यादीत नाव नसल्यास 'हे' काम करा..

या आर्थिक मदतीनंतर महिलांच्या कौशल्यविकास, उपजीविकेच्या संधी व स्वावलंबनासाठी मी अथक परिश्रम करेन, याची मी खात्री देतो. त्यांच्या प्रगतीतून प्रेरणा घेऊन घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज मी पूर्णपणे फेडण्यास वचनबद्ध आहे. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात सहभागी न होण्याची हमी मी देतो; माझ्या शिक्षण व संस्कारांमुळे मला हे सांगण्याचा पूर्ण विश्वास आहे. असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. , काँग्रेसच्या या प्रवक्त्याच्या अजब मागणीची सध्या चर्चा सोशल मीडियामध्ये रंगताना पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com