
Impact on India and China: Major Buyers of Russian Oil : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने जगातील अनेक देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत-पाकिस्तान, रशिया-युक्रेन किंवा इस्त्राईल-इराण संघर्ष असो, प्रत्येक ठिकाणी ते आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच त्यांच्या व्यापार धोरणामुळे जगावर आर्थिक संकट घोंघावू लागले असून आता भारताला ट्रम्प मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत.
अमेरिकेने रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांना कडक इशारा दिला आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षानंतर तीन वर्षांनीही भारतासह चीन व इतर काही देश रशियाकडून इंधन खरेदी करत आहे. त्यावरून अमेरिकेने चीन, भारताला 500 टक्के टेरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. असे झाल्यास भारताला हा मोठा झटका असणार आहे.
अमेरिकेतील खासदार लिंडसे ग्राहम यांनी एक महत्वपूर्ण बिल आणले आहे. त्यामध्ये रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 500 टक्के टेरिफ लावण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. खुद्द ट्रम्प यांचे या बिलाला समर्थन आहे. या बातमीमुळे भारतासह इतर अनेक देशांची चिंता वाढली आहे.
ग्राहम यांनी रविवारी एका मुलाखतीमध्ये या बिलाबाबत माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी जुलैमधील सुट्टयांनंतर हे बिल मतदानासाठी आणण्यास हिरवा झेंडा दाखवला आहे. हे बिल रशियाची युध्दातील मशिनरी कमजोर करण्यासाठी आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना यूक्रेन मुद्द्यावर चर्चेच्या टेबलपर्यंत आणण्याचे शस्त्र असल्याचे ग्राहम यांनी म्हटले आहे.
रशियातून तेलासह इतर साहित्य खरेदी करणाऱ्या भारत, चीनसारख्या देशांवर टेरिफ लावण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारत आणि चीन हे देश रशियाकडून 70 टक्के तेल खरेदी करतात. रशियासोबतचा व्यापार बंद करावा यासाठी अमेरिका या देशांवर या माध्यमातून दबाव आणू इच्छितो. हे बिल लागू करण्याचा निर्णय ट्रम्प यांच्यावर आहे, असेही ग्राहम यांनी स्पष्ट केले.
भारत रशियाकडून 40 ते 44 टक्के तेल आयात करते. जून महिन्यात 2-2.2 मिलियन बॅरल प्रतिदिन तेल आयात करण्याचे नियोजन भारताने केले. मागील दोन वर्षांतील हा सर्वाधिक आकडा आहे. अमेरिकेने बिल मंजूर केल्यास आणि भारतीय मालावर 500 टक्के टेरिफ लावल्यास अमेरिकेत भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील. याचा फटका थेट भारताच्या निर्यातीवर होणार आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिकेदरम्यान एका व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. टेरिफ कमी करण्याबाबत त्यामध्ये समझोता होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.