
Rohini Khadse targets Devendra Fadnavis, demands help for Priya Fuke : ''भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबीयांमार्फत सुनेचा छळ केला जात आहे. त्यांना घराबाहेर काढण्यात आले आहे. पोलिसही त्यांच्यावर दबाव टाकत आहे. राज्य महिला आयोगही दखल घ्यायला तयार नाही. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या लाडक्या भावानेसुद्धा मदत नाकारली.'', असे आरोप करत रोहणी खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला.
''प्रिया फुके यांना समर्थन देण्यासाठी आम्ही नागपूरला आलो आहोत. आमचा विषय राजकारणाचा नाही. आम्हाला मदतीची अपेक्षा आहे. महिला आयोगाकडून आम्हाला मोठी अपेक्षा होती. मात्र फुके कुटुंबीय सत्ताधाऱ्यांचे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही. पोलिस पीडित महिलेलाच चौकशीच्या नावावर बोलावून त्यांचा छळ करीत आहेत. अप्रत्यक्षपणे तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. किमान सरकारने लाडकी बहीण म्हणून प्रिया फुके यांना मदत करावी. आम्हाला आमच्या लाडक्या भावाकडून न्यायाची अपेक्षा होती.'' असे सांगून रोहिणी खडसे यांनी कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लागावला.
एकनाथ खडसे एकेकाळी भाजपचे मोठे नेते होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते महसूलमंत्री होते. एका जमिनीच्या प्रकरणात त्यांच्यावर चौकशी लावण्यात आली होती. त्यामुळे खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावरून खडसे आणि फडणवीस यांच्यात चांगलेच मतदभेद निर्माण झाल्याचे दिसत होते. शेवटी खडसे यांनी भाजप सोडली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेत पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.
दरम्यान लोकसभेच्या निवडणूक काळात खडसेंनी मात्र पुन्हा एकदा भाजपात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्या निवडणूकही जिंकल्या. मात्र यानंतरही एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झाला नाही.
गिरीश महाजन यांच्यासोबत खडसे यांचे चांगलेच खटकले आहे. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश टाळला जात असल्याचे बोलले जाते. खडसे हे सुद्धा अधून मधून देवेंद्र फडणवीसच यासाठी जबाबदार असल्याचे सूचित करीत असतात. आता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही या वादात उडी घेतली असल्याचे दिसून येते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.