BJP Lok Sabha Strategy : मंत्रिपदाची अपेक्षा करू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; सर्व आमदारांना भाजप हाय कमांडचे आदेश ?

BJP High Command News : लोकसभेसाठी भाजपने मिशन '४५ प्लस' लक्ष्य ठेवले आहे.
BJP Lok Sabha Strategy
BJP Lok Sabha StrategySarkarnama

Mumbai News : रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरुवात असताना आता भाजपच्या गोटातून अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपच्या सर्व आमदारांना हाय कमांडकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभेत सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत, त्यामुळे मंत्रिपदापेक्षा लोकसभा महत्त्वाची आहे, असा आदेशच भाजपच्या वतीने देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

BJP Lok Sabha Strategy
Women Reservation Bill : महिला आरक्षणाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण ?

लोकसभेसाठी भाजपने मिशन '४५ प्लस' लक्ष्य ठेवले आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने सर्व आमदारांकडे विशेष जबाबदारी दिली आहे. गणेशोत्सवानंतर फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारसंघ बांधण्याचे आदेश सर्व आमदारांना दिले गेले आहेत.

BJP Lok Sabha Strategy
Shivsena MLA Disqualification : एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजितदादा मुख्यमंत्री होणार ? राजकीय उलथापालथीची शक्यता !

शिंदे गटाचे आमदार वारंवार मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा सांगत असतात. मात्र, विस्तारावर कसलीच चर्चा नसल्याचे आता माहिती समोर येत आहे. भाजपने लोकसभेला महायुती म्हणून 'मिशन ४५ प्लस'चे लक्ष्य ठेवलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा भाजपने निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. यात महाराष्ट्र राज्याचं योगदान मोठे ठेवण्यासाठी भाजपने मतदारसंघनिहाय आमदारांना काम करण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Chetan Zadpe

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com