Droupadi murmu : राष्ट्रपती भावुक, म्हणाल्या, "मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी.."

मी वॉर्ड कॉन्सिलरपासून भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकले. भारतातील लोकशाहीची ही महानता आहे.
Droupadi murmu takes oth as a president
Droupadi murmu takes oth as a presidentsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू (Droupadi murmu) यांनी आज राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामना यांनी त्यांना शपथ दिली."मी माझी जीवनयात्रा ओडिसातील भुमीतून सुरु केली.आदिवासी समाजातून असलेली मी भारताची राष्ट्रपती झाले. लोकशाहीची ही ताकद आहे की, आदिवासी समाजातील, एका छोट्या गावातील मुलगी देशाच्या राष्ट्रपतीपदी झाली," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. (Droupadi murmu latest news)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीला ओरिसातील मयूरभंज जिल्ह्यातील 64 लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू म्हणाल्या,"एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी, आदिवासी समाजातील मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचते ही भारतातील लोकशाहीची ताकद आहे. राष्ट्रपती पदासाठी माझी निवड झाल्याने हे स्पष्ट होतंय की भारतातील लोक स्वप्नही पाहू शकतात आणि ती पूर्णही करू शकतात. मी आदिवासी समाजातून आहे. मी वॉर्ड कॉन्सिलरपासून भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकले. भारतातील लोकशाहीची ही महानता आहे,"

Droupadi murmu takes oth as a president
Shiv sena : उद्धव ठाकरे सुरतला गेले असते तर ?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या..

  1. मी माझी जीनवयात्रा ओडिसातील एका छोट्या गावातून सुरू केली होती. मी ज्या भागातून येते तिथे शिक्षण घेणंसुद्धा कठीण मानलं जातं. मात्र, अनेक संकटांनंतरही माझा संकल्प दृढ राहिला आणि मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी बनली.

  2. स्वतंत्र भारतात जन्मलेला मी पहिला राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीयांवर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी भारतातील तरुण आणि महिलांना खात्री देतो की या पदावर काम करताना त्यांच्या हितासाठी तत्पर असेल.

  3. संसदेत माझी उपस्थिती भारतीयांच्या आशा आणि हक्कांचे प्रतीक आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तुमचा विश्वास आणि पाठिंबा मला नवीन जबाबदारी घेण्याचे बळ देत आहे.

  4. राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू म्हणाल्या की, देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव येत्या काही दिवसांतच साजरा करणार आहे. देशाच्या राष्ट्रपती बनने माझे सौभाग्य आहे. देशाच्या जनतेचे मी आभार मानते. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी काम करणार आहे.

  5. नव्या रस्त्यावर चालणाऱ्या भारतासाठी प्रगतीचा संकल्प करीत आहे. मी समस्त देशवासीयांना विश्वास देते की, या पदावर काम करताना मला देशहित महत्वाचे असेल. भारताच्या आजवरच्या सर्व राष्ट्रपतींनी हे पद भुषवले आहे.

  6. देशाच्या महान स्वातंत्र्यसेनानींनी राष्ट्रीय स्वाभिमान शिकवला. राणी लक्ष्मीबाई, राणी चेनम्मासारख्या महिलांनी नारीशक्तीची भुमिका दाखवून दिली. संथाल क्रांतिने आदिवासींच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. बिरसा मुंडा यांच्याकडून प्रेरणा मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com