पुणे : शिवसेना (shivsena) कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार, शिंदे गटाकडून होणारे आरोप या सगळ्यांची उत्तर शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) देणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे. (uddhav thackeray latest news)
उद्धव ठाकरे यांची मुलाखत 26 आणि 27 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा टिझर आज संजय राऊतांनी टि्वट केला आहे. या मुलाखतीत संजय राऊत सध्याची राजकीय परिस्थिती, जनतेच्या मनातील प्रश्नाबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत.
या मुलाखतीत “हम दो एक कमरे में बंद हो असं सध्याचं सरकार आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. उद्धव ठाकरे राजीनामा द्यायला तयार होते का? आणि विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेले असते तर काय झालं असतं? हे जनतेच्या मनातील दोन प्रश्नांना ठाकरे यांनी काय उत्तर दिले हे उद्या आणि परवा पाहायला मिळणार आहे.
राऊतांनी ठाकरेंना विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे मिळणार
उद्धव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?
बंडाविषयी आणि येणाऱ्या भविष्यातील निवडणुकांविषयी काय वाटतं?
निवडणूक आयोगापुढे एक नवीन खटला उभा राहतोय, धनुष्यबाण कुणाचा?
ठाकरेंना पुरावे द्यावे लागत आहेत शिवसेना खरी किंवा खोटी?
आज जी फूट दिसतेय शिवसेनेत, याआधी राणे, भुजबळांनाही पाडता आली नव्हती, नक्की काय चुकलं?
महाविकास आघाडीचा प्रयोगच चुकला?
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.