Dhananjay Chandrachud : देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सतत चर्चेत असतात. प्रसंगी त्यांनी देशातील सत्ताधाऱ्यांविरोधात जाऊनही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजलेल्या निवडणूक रोखे प्रकरणाचा देखील आहे. अशा अनेक महत्वाच्या खटल्यांची सुनावणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतली आहे.
धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjay Chandrachud) हे जसे त्यांच्या खटल्यांमुळे चर्चेत असतात तसेच ते त्यांच्या शिस्तप्रिय आणि कठोर स्वभावासाठीही ते ओळखले जातात. सध्या त्यांच्या याच स्वभावाचा अनुभव सर्वोच्च न्यायालयातील वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांना आला आहे.
NEET-UG परीक्षेबाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड हे वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांच्यावर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. तर सरन्यायाधीश वकिलावर नेमकं का संतापले ते याबाबतची माहिती बार अँड बेंचने सविस्तरपणे त्यांच्या एक्स हँडलवर दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मंगळवारी NEET-UG परीक्षेबाबत सुनावणी चालू असताना परीक्षेसंदर्भातील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील हूडा हे युक्तिवाद करत होते. यावेळी त्यांना मध्येच थांबवून वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांनी, "मला काहीतरी बोलायचं आहे" असं म्हणत वकील हुडा यांना मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, नेदुमपरा यांच्या या कृतीवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हुडा यांचा युक्तीवाद संपल्यानंतर तुम्हाला बोलायची संधी देतो, असं सांगितलं. परंतु, नेदुमपरा यांनी थेट सरन्यायाधीशांनाच विरोध करत, मी इथे सर्वात ज्येष्ठ असून मला बोलायची संधी मिळायला पाहिजे, असं म्हटलं. वकिलांचं हे उत्तर ऐकून सरन्यायाधीश चांगलेच भडकले.
सरन्यायाधीश (Dhananjay chandrachud) म्हणाले, "मी तुम्हाला ताकीद देतोय, तुम्ही असा संवाद करू शकत नाही. मी या कोर्टाचा इनचार्ज आहे." सरन्यायाधीशांनी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट सुरक्षा अधिकाऱ्यांना आदेश दिले की, "सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवा आणि यांना बाहेर काढा."
यावर मॅथ्यूज नेदुमपरा म्हणाले, "मी जातोच आहे, तुम्ही मला अशा प्रकारे बाहेर काढायची आवश्यकता नाही." मात्र, मॅथ्यूज यांच्या या वक्तव्यार सरन्यायाधीश आणखी संतापले आणि म्हणाले, "तुम्ही हे असं बोलायची गरज नाही. तुम्ही जाऊ शकता. मी मागील 24 वर्षांपासून न्यायव्यवस्था पाहतोय, अशा प्रकारे वकिलांना कोर्टात कामकाज कसं व्हायला पाहिजे हे ठरवू देऊ शकत नाही." यावर मॅथ्यूज नेदुमपरा यांनी, मी 1979 पासून न्यायप्रक्रिया पाहतोय, असं उत्तर दिलं.
यावर मात्र सरन्यायाधीशांनी वकिलांना शेवटचा इशारा देत म्हणाले, आता मला कदाचित तुमच्याविरोधात असे आदेश द्यावा लागेल, जो तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. तसंच यावेळी प्रकरण तापल्याचं पाहून केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी देखील "हे न्यायालयाचा अवमान करणारं आहे", असं म्हटलं त्यानंतर मात्र, वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांनी, 'मी जातोय' असं म्हणत ते न्यायालयातून बाहेर पडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.