NCP Crisis News : अजितदादांच्या घड्याळाची टिकटिक थांबणार? सुप्रीम कोर्टाकडून मोठे संकेत

Supreme Court News : शरद पवारांचे नाव, फोटो वापरू नका, असे सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला ठणकावले आहे. तसे लेखी देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama

New Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर (NCP Crisis News) केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल दिला. त्यामुळे पक्षाचे घड्याळ चिन्हही अजित पवारांना मिळाले. आता त्यावरच शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून घड्याळ चिन्ह वापरू न देण्याची जोरदार मागणी केली. त्यावर कोर्टानेही घड्याळ चिन्हाबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. 

निवडणूक आय़ोगाच्या (Election Commission) निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. आज त्यावर न्यायाधीश सूर्यकांत आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्यासमोर सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला जात असल्याचे कोर्टात सांगितले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : भाजपने दोन याद्यांमध्ये 67 खासदारांना दाखवला घरचा रस्ता; बड्या नेत्यांचा समावेश

सिंघवी यांनी कोर्टात शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो असलेली अजित पवार गटाची पोस्टरही दाखवली. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्हीच मते मिळवा. शरद पवारांचे नाव वापरून कशाला मते मागता, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कोर्टानेही अजित पवार गटाला ठणकावताना तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुमचेच फोटो वापरा, त्यांचे फोटो का वापरत आहात, असा सवाल उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वतंत्र होण्याचा निर्णय तुम्ही घेतला आता त्यावर ठाम राहा. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आवरावे. शरद पवारांचे नाव व फोटो वापरणार नाही, याची हमी देण्याचे निर्देश कोर्टाने आज अजित पवार गटाला दिले. सिंघवी यांनी घड्याळ चिन्हाच्या वापरावरही आक्षेप घेतला.

आम्हाला नवीन चिन्ह मिळाले त्यांनीही घड्याळाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे. घड्याळ चिन्हही शरद पवारांची ओळख आहे. त्यावर अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला. पण कोर्टाने सिंघवी यांच्या मुद्द्याला दुजोरा देत अजित पवार यांनी निवडणुकीसाठी 'घड्याळ' चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असे कोर्टाने सुचवले आहे. दोन्ही गटांना यावर म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले असून, पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

R

Sharad Pawar, Ajit Pawar
BJP Second Candidate List: भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र, 'या' नव्या चेहऱ्यांना उमेदवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com