Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी पक्ष फोडले, पण जागावाटपात भाजपच्या गळ्याशी आले...

BJP, Shivsena, NCP : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील दोन पक्ष फोडले, विरोधातील अनेक दिग्गज नेत्यांना गळाला लावले. आता जागावाटप करताना भाजपच्या नाकीनऊ आल्याचे दिसून येत आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Political News : राज्यातील लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे भाजपे उद्दिष्ट आहे. त्यानुसार मिशन 45 चा गवगवा वर्षभरापासून सुरू करण्यात आला आहे. भाजपचे नियोजन किती सरस आहे, असा डांगोराही पिटून झाला आहे. मात्र, आता प्रत्यक्ष लढण्याची वेळ आली तर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवणे भाजपला अद्याप शक्य झालेले नाही. निवडणूक जिंकण्यासाठी गाव गोळा केलेला भाजप आता जागावाटपाच्या चक्रव्यूवहात अडकल्यासारखा दिसत आहे. Lok Sabha Election 2024

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून फुटलेल्या गटाने भाजपसोबत येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकारचे पतन झाले. शिवसेनेत फूट पडूनही आपले भागणार नाही, असे कदाचित भाजपला वाटले असेल. त्यामुळे गेल्या वर्षी राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला भाजपने गळाला लावून महायुतीत सरकारमध्ये स्थान दिले. तरीही भाजपची भूक शमली नाही. अशोक चव्हाण यांच्यानंतरही राज्यात आणखी राजकीय भूकंप होणार, असे इशारे भाजपचे नेते देत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Rohit Pawar : इंग्रजांनीही विकास केला म्हणून लोक त्यांच्यासोबत गेले का? अजितदादांबाबत रोहित पवार असं का बोलले

महायुतीमध्ये दिग्गज नेत्यांची भाऊगर्दी झाली आहे. अनेक मतदारसंघांमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार, हेही अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. नेत्यांची इन्कमिंग करताना भाजपने काही नियोजन केले होते का, अंतर्विरोध वाढणार नाहीत, याची काळजी घेतली होती का, असे प्रश्न आता निर्माण होत आहेत.

उस्मानाबाद (धाराशिव), नाशिकसह अन्य काही मतदारसंघांत महायुतीच्या जागावाटपाचे घोडे अडले आहे. धाराशिव मतदारसंघ (Dharashiv) कोणाला आणि उमेदवार कोण असणार याची उत्सुकता इतकी ताणली गेली की ती आता तुटली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. राज्यात, केंद्रात सत्ता असतानाही काही जागांबाबतचा तिढा लवकर सोडवता येत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Shirur Loksabha constituency : शिरूरमध्ये महायुतीत नाराजी? समन्वय बैठकीला भाजप नेत्यांची दांडी

महायुतीत जागा कोणत्याही पक्षाला सुटलेली असली तरी आपण सांगू तोच उमेदवार असावा, अशी काहीशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे. उस्मानाबाद मतदारसंघात याचा प्रत्यय येऊ लागला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर Omprakash RajeNimbalkar (शिवसेना, ठाकरे गट) यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, महायुतीला आपला उमेदवार ठरवता आलेला नाही.

हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे, असे असतानाही उमेदवार आपल्या मर्जीतील राहील, याची काळजी भाजकडून घेतली जात आहे. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी या मतदारसंघात भाजपकडून लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडूनही प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव चर्चेत आले होते.

राष्ट्रवादीकडून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे इच्छुक आहेत. त्यांच्यासह मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव चर्चेत आले. याचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या भाजपचे तुळजापूरचे आमदार, जिल्ह्यातील भाजपचे शक्तिशाली नेते राणाजगतिसिंह पाटील (Ranajagjitsingh Patil) यांच्या पत्नी आहेत. त्या आजच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उस्मानाबाद मतदारसंघ हे एक उदाहरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी महायुतीची अशी अवस्था झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
MLA Vikram Kale: शिक्षक आमदार विक्रम काळे या वेळी तरी घेणार का खासदारकीचं प्रमोशन?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com