ED News : सनदी अधिकारी सचिन सावंत यांना ईडीकडून अटक ; नातेवाईकांची चौकशी सुरु..

Accused filed complaint against Sawant : त्यांच्या नातेवाईकांची चौकशी ईडीचं पथक करीत आहे.
  ED
EDSarkarnama

Mumbai News : ईडीनं आज (बुधवारी) लखनौ येथून एका ज्येष्ठ आयआरएस (IRS) अधिकाऱ्याला अटक केली आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (ed arrests addn director of customs gst sachin sawant for involvement in embezzlement of 500 crores)

सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत यांना ईडीनं लखनौ येथून अटक केली आहे. सचिन सावतं हे ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत.

500 कोटीं रुपयांच्या गैरव्यवहारात सावंत यांचा सहभाग असल्याचा आरोप ईडीने केला आहे. सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. त्यांच्या नातेवाईकांची चौकशी ईडीचं पथक करीत आहे. याबाबत सीबीआयनं (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली आहे.

  ED
Cabinet Meeting : विठ्ठलाच्या महापुजेपूर्वी मुख्यमंत्री घेणार मोठे निर्णय ; जाहिरात वादानंतर दोन आठवड्यांनी मंत्रीमंडळाची..

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी सचिन सावंत यांना बुधवारी अटक केली. आयआरएस कॅडरचे अधिकारी सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई झोन २ मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते.

  ED
Balasaheb Thorat :..तर तो देशातला सर्वात मोठा विजय असेल; बाळासाहेब थोरातांना विश्वास

हिरे व्यापाऱ्यांनी ५०० कोटीहून अधिक रकमेचे बेकायदा हस्तांतरण आणि हस्तांतरण केल्याच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

सावंत यांच्या निवासस्थानी टाकलेल्या या छाप्याकडे चौकशीचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. पुरावे गोळा करण्यासाठी आणि सावंत यांचा बेकायदा हस्तांतरण आणि पैसे पाठविण्यात काही संबंध किंवा सहभाग आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com