Balasaheb Thorat :..तर तो देशातला सर्वात मोठा विजय असेल; बाळासाहेब थोरातांना विश्वास

Maharashtra Politics : राजकारण हे महत्वाकांक्षावरच चालतं आणि कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा असते
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News :आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागा जागावाटप आणि मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावरून मोठी रस्सीखेच सुरु आहेत. शिंदे-फडवणीस सरकारच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना विरोधकांकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असाही प्रश्न उपस्थित केलेला आहे.

एकीकडे महाविकास आघाडी मधील जागावाटप आणि भावी मुख्यमंत्री याबद्दल निश्चितता नसली तरी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मात्र 2024 ला महाविकास आघाडी एकत्र लढली तर तो देशातील सर्वात मोठा असा विजय महाराष्ट्रात दिसेल, असा विश्वास नुकताच व्यक्त केला आहे.

थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीतील आम्ही तीन पक्ष आणि मित्रपक्ष एकत्र आहोत. कोणत्या जागेवर कोण निवडून येऊ शकतो यासाठी आम्हाला एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. निश्चितपणे हे मान्य करावे लागेल की जास्तीत जास्त जागांसाठी सर्व आग्रही राहणार आहेत हे मान्य करावे लागेल. मात्र एकमेकांचे समाधान करून सन्मान राखावा लागेल आणि यातून महाविकास आघाडी एकत्र लढली तर हा देशातील सर्वात मोठा विजय असेल असा अशी खात्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

Balasaheb Thorat
Ramdas Athawale on Pankaja Munde : पंकजा मुंडे बीआएस मध्ये जाणार ? आठवले म्हणतात, 'त्या नाराज..'

बीआरएस भाजपची बी टीम ?

तेलंगणा मधील के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सध्या महाराष्ट्रात आपले पाय पसरू पसरवत आहेत. याबद्दल थोरात यांना विचारले असता त्यांनी, सध्या बीआरएस कडून खेडोपाड्यापर्यंत मोठमोठे फ्लेक्स लावल्याचे दिसून येतेय. त्यांनी पंढरपूर दौराही केलेला आहे. मात्र यामागे एक राष्ट्रीय चाल असल्याचं दिसून येते असं थोरात म्हणाले. बीआरएस हा पक्ष भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून काम करत आहे, या मताचे आम्ही आहोत असे थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat
Ram Shinde News : बारामतीकरांना कुणाची भाषा समजली ? सीतारामन की सिद्धरामय्या यांची ; राम शिंदेंचा खोचक सवाल

राज्य पुढे चालले आहे ...

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले फ्लेक्स आणि त्यात नुकतेच लावण्यात आलेले बाळासाहेब थोरात यांचाही भावी मुख्यमंत्री या आशयाचा फ्लेक्स यावर थोरात यांना विचारला असता त्यांनी, हा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. राजकारण हे महत्वाकांक्षावरच चालतं आणि कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा असते आणि त्यात चूक नाही. त्याचबरोबर इतके मुख्यमंत्री पदाचे दावेदार होत असतील तर राज्य पुढे चालले आहे असंच म्हणावे लागेल, असा टोमणा थोरातांनी यावेळी लगावला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com