ED Raid: दरवाजा बंद होताच शिडीवरून घरात घुसले ED अधिकारी; 600 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश, ईडीची सर्वात मोठी कारवाई!

ED Raid Jharkhand: झारखंडमधील धनबाद येथे ED ची मोठी छापेमारी. 600 कोटींच्या कथित बेनामी मालमत्तेचा पर्दाफाश; व्यापाऱ्याने दरवाजा बंद केल्याने अधिकाऱ्यांनी शिडी लावून घरात प्रवेश केला.
ED Raid Jharkhand:
ED Raid Jharkhand:AI
Published on
Updated on

ED Raid News: सक्तवसुली संचालनालयाने (ED) झारखंडमधील धनबाद येथे कोळसा माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल 25 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली आहे.

या कारवाईत 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बेनामी मालमत्ता, 160 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड, 200 हून अधिक मालमत्तांची कागदपत्रे आणि कोट्यवधींची बेहिशेबी रोकड समोर आली आहे. एका व्यापाऱ्याने घराचा दरवाजा आतून बंद केल्याने अधिकाऱ्यांना थेट शिडी लावून घरात प्रवेश करावा लागला.

पहाटेच ED चा 'ऑपरेशन ब्लॅक डायमंड'

धनबादमधील सरायढेला, झरिया, कटरास, बँक मोड आणि इतर भागांत पहाटेपासूनच ED च्या रांची विभागीय पथकाने एकाच वेळी छापेमारी सुरू केली. कारवाईचे लक्ष्य होते कोळसा व्यापाराशी संबंधित मोठे व्यावसायिक, आउटसोर्सिंग कंत्राटदार आणि कथित सिंडिकेटशी जोडलेले आर्थिक व्यवहार.

या छापेमारी बीसीसीएलचे (BCCL) प्रमुख आउटसोर्सिंग कंत्राटदार लाल बाबू सिंग (एल.बी. सिंग), कोळसा व्यापारी अनिल गोयल आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित अनेक ठिकाणांची झडती घेण्यात आली.

ED Raid Jharkhand:
Tukaram Munde: सिन्नरच्या जनता दरबारात तुकाराम मुंढे यांच्या FDA विभागाचा पंचनामा; भेसळखोरांना संरक्षण?

600 कोटींचे साम्राज्य उघड

तपासादरम्यान ED च्या हाती धक्कादायक माहिती लागली. 160 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड गोठवण्यात आले असून 500 ते 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बेनामी मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

यामध्ये भूखंड, व्यावसायिक संकुले, खाण व्यवसायातील गुंतवणूक, बँक खात्यांचे तपशील आणि 200 हून अधिक स्थावर मालमत्तांशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. याशिवाय 1.02 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी रोकड आणि अनेक डिजिटल पुरावेही जप्त करण्यात आले.

मनी लाँड्रिंगच्या पैशांचा माग

ही संपूर्ण कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे. बेकायदेशीर कोळसा उत्खनन, खंडणी, अनधिकृत वसुली आणि त्यातून उभारलेल्या आर्थिक साम्राज्याचा माग काढण्यासाठी ED गेल्या काही महिन्यांपासून गुप्त तपास करत होती. केंद्र सरकारच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणानंतर या कारवाईला वेग आल्याचे सांगितले जात आहे.

व्यापाऱ्याने दरवाजा बंद केला, ED शिडीवरून घरात

कारवाईदरम्यान काही ठिकाणी ED पथकाला विरोधाचाही सामना करावा लागला. लोयाबाद परिसरात महिलांनी अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर झरियातील शिमला बहाल भागात एका कोळसा व्यापाऱ्याने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला.

मात्र ED चे पथक यांनी माघार घेतली नाही. अधिकाऱ्यांनी तातडीने शिडी आणून घराच्या वरच्या बाजूने प्रवेश केला आणि त्यानंतर संपूर्ण घराची झडती घेत तपास सुरू ठेवला. या घटनेची परिसरात मोठी चर्चा रंगली.

ED Raid Jharkhand:
Old Pension Scheme: 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियुक्त हजारो शिक्षकांना मोठा दिलासा! जुनी पेन्शन लागू; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

'ब्लॅक डायमंड'च्या काळ्या साम्राज्यावर ED चा घाव

धनबादला देशाची 'कोळसा राजधानी' म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक दशकांपासून येथे बेकायदेशीर उत्खनन, कोळसा चोरी आणि सिंडिकेटचे जाळे कार्यरत असल्याचे आरोप होत आले आहेत. या पार्श्वभूमीवर झालेली ED ची ही धाड कोळसा माफियांच्या आर्थिक साम्राज्यावरचा सर्वात मोठा घाव मानली जात आहे. तपास अद्याप सुरू असून येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com