Old Pension Scheme: 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियुक्त हजारो शिक्षकांना मोठा दिलासा! जुनी पेन्शन लागू; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Bombay High Court on Old Pension Scheme: 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त होऊन नंतर अनुदानित झालेल्या सहाय्यक शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश.
Bombay High Court on Old Pension Scheme: 31 ऑक्टोबर 2005
Bombay High Court on Old Pension Scheme: 31 ऑक्टोबर 2005A1
Published on
Updated on

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजनेबाबत (OPS) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित शाळांमध्ये नियमानुसार नियुक्ती झालेल्या आणि नंतर त्या शाळांना 100 टक्के अनुदान मिळालेल्या सहाय्यक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme - OPS) लागू होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि मंदार देशपांडे यांच्या खंडपीठाने 23 जुलै 2026 रोजी हा निकाल दिला.

याचिकाकर्ते 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित विभागात नियमानुसार सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर संबंधित शाळा व विभागांना 100 टक्के अनुदान मंजूर झाले असून, शिक्षकांच्या सेवेलाही शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना महाराष्ट्र नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1982 नुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यास ते पात्र आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Bombay High Court on Old Pension Scheme: 31 ऑक्टोबर 2005
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' 32 हून अधिक कंपन्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; किती पगार वाढणार?

शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश रद्द

या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी संबंधित शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ नाकारला होता. मात्र, हा आदेश बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयाने तो रद्द (Quash and Set Aside) केला.

राज्य सरकारला न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

न्यायालयाने राज्य शासन, शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना याचिकाकर्त्या शिक्षकांना महाराष्ट्र नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1982 तसेच लागू असलेल्या इतर नियमांनुसार जुनी पेन्शन योजनेचे सर्व लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत.

Bombay High Court on Old Pension Scheme: 31 ऑक्टोबर 2005
Shalarth Scam: शिक्षण क्षेत्र हादरलं! माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक! सरकारला 160 कोटींचा चुना; SIT च्या रडारवर 1200 जण

याचिका मंजूर; प्रकरण निकाली

या प्रकरणातील सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने संबंधित शिक्षकांची याचिका मंजूर केली असून प्रकरण निकाली काढले आहे.

हजारो शिक्षकांसाठी महत्त्वाचा निकाल

या निर्णयामुळे 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्ती होऊन नंतर त्या शाळा किंवा विभागांना अनुदान मिळालेल्या आणि सेवेला शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सहाय्यक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होईल, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

शिक्षक संघटनांच्या मते, या निर्णयाचा लाभ राज्यातील अशाच परिस्थितीतील हजारो शिक्षकांना मिळू शकतो. त्यामुळे जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील अनेक प्रलंबित प्रकरणांवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com