Mohammad Azharuddin : मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘क्रिकेट’मुळे पडणार विकेट; ED ‘तो’ घोटाळा काढणार बाहेर

Hyderabad Cricket Association ED Action Congress : हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनमधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी मोहम्मद अझरुद्दीन यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.
Mohammed Azharuddin
Mohammed AzharuddinSarkarnama
Published on
Updated on

Hyderabad News : माजी क्रिकेटपटू व काँग्रसचे नेते मोहम्मद अझरुद्दीन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. क्रिकेटमुळेच तो गोत्यात आले असून सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्यांना भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनमधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी ही चौकशी होणार असल्याचे समजते.

ईडीने अझरुद्दीन यांना पहले समन्स पाठवले आहे. अझरुद्दीन हे हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात कामकाजात अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे. त्याचा तपास आता ईडी करणार आहे. हा भ्रष्टाचार सुमारे 20 कोटी रुपयांचा असल्याचा सांगितले जात आहे.

Mohammed Azharuddin
Haryana AAP and JJP News : हरियाणात निवडणुकीआधी 'AAP' अन् 'JJP'ला झटका ; जोरदार राजकीय घडामोडी सुरू!

हैद्राबादमधील राजीव गांधी क्रिकेट स्टेडिअमसाठीच्या डिझेल जनरेटर, अग्निशमन प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीत हेरीफेरी केल्याचा अझरुद्दीन यांच्यावर आरोप आहे. मागील वर्षीच ईडीने पीएमएमएल कायद्यानुसार तेलंगणामधील 9 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यामध्ये असोसिएशनचे माजी पदाधिकारी गद्दाम विनोद, शिवलाल यादव आणि अरशद अयूब यांच्या घरांचा समावेश आहे. या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.

हैद्राबादमधील अँटी करप्शन ब्युरोने दाखल केलेल्या तीन गुन्ह्यांच्या आधारावर ईडीकडून ही चौकशी केली जात आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी संस्थांशी संगनमत करून वाढीव दराच्या निविदा मंजूर केल्या, काम पूर्ण होण्याआधीच त्यांना पैसे दिले, यामध्ये मोठी देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे.

Mohammed Azharuddin
Haryana AAP and JJP News : हरियाणात निवडणुकीआधी 'AAP' अन् 'JJP'ला झटका ; जोरदार राजकीय घडामोडी सुरू!

अझरुद्दीन हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी होणार असल्याने काँग्रेससाठीही हा झटका आहे. सध्या ते पक्षात फारसे सक्रीय नसले तरी ते पक्षाचे माजी खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी काही मतदारसंघात प्रचार केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com