संजय राऊत UP च्या मोहिमेवर; इकडे निकटवर्तीयांना ईडीचा दणका

ED Raid | Sanjay Raut | Nawab Malik | Arrested |: ईडीने आता कारवाईचा फास संजय राऊतांभोवती आवळला...
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

लखनौ : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने(Shivsena) कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेचे ३७ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे नेते-खासदार संजय राऊत (Sanjay Raut), नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी उत्तरप्रदेश मोहिमेवर गेले आहेत. मात्र ही मोहिम सुरु असतानाच ईडीने महाराषट्रात संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले आहेत. त्यामुळे ईडीने आता कारवाईचा फास संजय राऊतांभोवती आवळला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ईडीच्या दिल्लीतील टीमने आज दुपारी संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रविण राऊत यांच्याशी संबंधित २ जणांवर छापेमारी केलेली आहे. प्रविण राऊत यांच्या १ हजार कोटींच्या बेनामी संपत्ती संदर्भात दिल्ली ईडीच्या २० अधिकाऱ्यांच्या टीमकडून ठाणे, रायगड भागांमध्ये छापेमारी करण्यात आली. पर्ल ग्रुप नावाच्या कंपनीने लोकांचे कोट्यवधी रुपये बुडवल्यानंतर सेबीने या कंपनीवर कारवाई केली होती. याच कंपनीने प्रविण राऊत यांना १ हजार कोटी रुपये दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याच पैशातून राऊत यांनी जमिनी खरेदी केल्या होत्या. ही मालमत्ता बेनामी असल्याने आता ईडीने कारवाई सुरू केल्याची माहिती मिळत आहे. ईडीने २ फेब्रुवारी रोजी प्रविण राऊत यांना अटक केली आहे.

ईडीकडून नवाब मलिकांना अटक

दरम्यान ईडीने काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित लोक आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात जमिनीचे व्यवहार झाले होते आणि याचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, असा दावा ईडीने केला. यानंतर न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

पण मलिक यांच्या चौकशीमागे राजकीय सुडबुद्धी असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याच कारवाईचा निषेध म्हणून आणि महाविकास आघाडीची एकजूट म्हणून आज महाविकास आघाडीकडून मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे जवळपास सगळे नेते, मंत्री, आमदार सहभागी झाले आहेत. तर शिवसेनेकडून मंत्री सुभाष देसाई, आमदार यामिनी जाधव आणि सचिन आहिर हे उपस्थित आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com