Hemant Soren News : मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ ; हेमंत सोरेन यांना तिसऱ्यांदा समन्स; चौकशीला हजर राहण्याचा ईडीचा आदेश

Jharkhand News : सोरेन यांचे बँक पासबुक आणि स्वाक्षरी असलेले चेकबुक सापडले होते.
CM Hemant Soren ED Action
CM Hemant Soren ED ActionSarkarnama
Published on
Updated on

Ranchi : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तिसऱ्यांदा त्यांना खाण प्रकरणात समन्स बजावले आहे. सोरेन यांना नऊ सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचा आदेश ईडीकडून देण्यात आला आहे.

जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना ९ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याच्या आदेश दिला आहे. त्यांना रांची येथील क्षेत्रीय कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.(Latest Marathi News)

CM Hemant Soren ED Action
Sudhir More Death : रेल्वेखाली उडी घेऊन ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

त्यानंतर सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतरही आज पुन्हा एकदा ९ सप्टेंबरला हजर राहण्याची आदेश ईडीने दिली आहेत. यापूर्वीही खाण प्रकरणातील आरोपी आणि हेमंत सोरेनचे जवळचे पंकज मिश्रा यांच्या घरावर छाप्यादरम्यान ईडीला CM हेमंत सोरेन यांचे बँक पासबुक आणि स्वाक्षरी असलेले चेकबुक सापडले होते.

त्यांनी ईडीकडून समन्स बजावणे हा असवैधानिक असल्याचे म्हटले आहे. हेमंत सोरेन यांना यापूर्वी ईडीकडून १४ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा समन्स बजविण्यात आले होते. त्यानंतर ते हजर झाले नसल्याने दुसऱ्यांदा २४ ऑगस्ट रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

CM Hemant Soren ED Action
Sanjay Raut News : 'एक देश एक निवडणूक' कशाला ? निवडणुका पुढे ढकलण्यासाठी मोदींचे हे षडयंत्र...
  1. ईडीने यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.

  2. ईडीने झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी कोषाध्यक्ष रवी केजरीवाल यांचा जबाबही नोंदवला आहे.

  3. पंकज मिश्रा यांच्या निवासस्थानातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये सोरेन यांचे पासबुक देखील आहे.

  4. एका बंद लिफाफ्यात एक पासबुक आणि दोन चेकबुक सापडले आहेत, ज्यामध्ये दोन चेकवर स्वाक्षरीही आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com