Eknath Shinde Ayogya news: अयोध्या दौऱ्यावर टिका करणाऱ्या विरोधकांवर एकनाथ शिंदेंचा पलटवार; मी घरात बसून....

राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झालेले असताना हे अयोध्या दौरा करत असल्याची संजय राऊत यांनी केली होती.
Eknath Shinde Ayogya news:
Eknath Shinde Ayogya news:
Published on
Updated on

Eknath Shinde in Ayodhya Visit : आमच्या यात्रेने काही लोकांना त्रास झालाय. म्हणून ते आमच्यावर आरोप करत आहेत. राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झाले असताना आम्ही अयोध्या दौऱ्याची गेल्याची टिका करत आहेत. पण दौऱ्यावर आलो असलो तरी सकाळी सात वाजल्यापासून नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मी अयोध्येतून त्यांच्याशी संपर्कात आहे.मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही तर फिल्डवर उतरुन काम करणारा मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतल,त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येत प्रभु रामाचं मंदिर व्हावं, जम्मू कश्मीर मधून ३७० कलम हटवलं जावं हे दिवंगत बाळासाहेबांच स्वप्न होतं. ते स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. पण काही लोकांना हिंदूत्त्वाची अॅलर्जी आहे. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदूत्त्वाचे विचार शिकवले. पण इतर धर्माचे अपमान करणारे आमचे हिंदुत्त्व नाही. २०१४मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देशात हिंदुत्त्वाचे सरकार स्थापन झाले. मोदींमुळे हिंदुत्त्वाचा जागर झाला. असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षावही केला.

Eknath Shinde Ayogya news:
Tigers in India: भारतात वाघांची संख्या वाढली! पंतप्रधान मोदींनी थेट आकडेवारीच जाहीर केली

पण आज सत्तेसाठी काही लोकांनी वडिलांच्या विचारांनाच तिलांजली दिली २०१९ ला जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता.राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन होईल असं वाटलं होतं, पण काही लोकांनी सत्तेच्या लालसेने चुकीचे पाऊल उचलले. पण आठ-नऊ महिन्यांपूर्वी आम्ही लोकांच्या मनातले सरकार स्थापन केले. आज शिवसेना भाजप सत्तेत आल्याचा जनतेला आनंद होत आहे. भाजप आणि शिवसेनेची एकच विचारधारा आहे. पण जाणीवपूर्वक काही लोक चुकीचा समज पसरवत आहेत. पण लोक समजदार आहेत. आज लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आहे. याच विचारधारेने आम्ही अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घ्यायला आलो आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com