Jharkhand Assembly Election : झारखंड विधानसभेच्या तारखा जाहीर; दोन टप्प्यांत होणार निवडणूक

Election Commission of India Election Schedule Rajiv Kumar : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राबरोबरच झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणाही केली आहे.
Jharkhand Election
Jharkhand ElectionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्रासोबत झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार झारखंडमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल.

झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला 81 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. मागील निवडणूक डिसेंबर 2019 मध्ये झाली होती. यावेळी एक महिना आधी निवडणूक होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. राज्यात दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे.

मागील निवडणूकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीने 47 जागा मिळवत भाजपची सत्ता उलथवून टाकली होती. भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या होत्या. राज्यात 41 हा बहुमताचा आकडा आहे. या निवडणुकीनंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या पक्षाला राज्यात 30 जागा तर काँग्रेसला 16 जागा मिळाल्या होत्या. मात्र, मागील वर्ष झारखंड सरकार आणि आघाडीसाठी त्रासदायक ठरले.

Jharkhand Election
Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचा शंखनाद, 20 नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी लागणार 'युती की आघाडी'चा निकाल

कथित भूखंड प्रकरणात अडकल्याने सोरेन यांना राजीनामा द्यावा लागला. ईडीने त्यांना अटक केली आणि त्यानंतर चंपई सोरेन मुख्यमंत्री झाले. जवळपास पाच महिन्यांनंतर हेमंत सोरेन तुरुंगातून जामीनावर बाहेर आले. चंपई सोरेन यांना राजीनामा द्यायला सांगत पुन्हा ते मुख्यमंत्री झाले.

आपला अपमान झाल्याचे सांगत चंपई सोरेन यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश कला. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक होणार आहे. यावेळी एनडीए विरुध्द इंडिया आघाडी अशी थेट लढत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com