निवडणूक आयोगाचा दणका! सत्ताधारी आमदार आला अडचणीत

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला आता निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.
Narendranath Chakraborty
Narendranath ChakrabortySarkarnama
Published on
Updated on

कोलकता : मतदारांना धमकावल्याप्रकरणी सत्ताधारी पक्षाचा आमदार आता अडचणीत आला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) या आमदाराला आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाईचा दणका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार नरेंद्रनाथ चक्रवर्ती (Narendranath Chakraborty) यांना प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. राज्यातील लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या रणधुमाळीत तृणमूलला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पांडवेश्वर मतदारसंघाचे आमदार असलेल्या चक्रवर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ते मतदारांना धमकी देताना दिसून आले होते. भाजपला मतदान करणाऱ्यांना ते धमकावत होते. याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिशीला दिलेल्या उत्तरात चक्रवर्ती यांनी सगळे आरोप फेटाळून लावले होते. याचबरोबर त्यांना आजपासून सात दिवस प्रचार करण्यास बंदी घातलण्यात आली आहे.

Narendranath Chakraborty
वाहनचालकांना दणका! पेट्रोल, डिझेल 9 दिवसांत 8 वेळा महागलं

मतदारांच्या मत स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणारी कृती चक्रवर्ती यांनी केल्याचा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे. आमदार चक्रवर्ती यांनी मतदारांना धमकी दिल्याचे स्पष्टपणे दिसत असून, त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असेही आयोगाने नमूद केले आहे. यामुळे त्यांना प्रचारबंदी करण्यात आली असून, त्यांना सार्वजनिक सभा, रॅली, रोड शो, मुलाखती आणि जाहीर निवेदन करता येणार नाही. त्यांच्यावरील ही बंदी 6 एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. निवडणूक आयोगाने 12 मार्चला असनसोल लोकसभा मतदारसंघ आणि बल्लीगंज विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यामुळे प्रचाराला जोर चढला आहे.

Narendranath Chakraborty
वाद पेटला! भाजपच्या दोन आमदारांना मार्शलनी विधानसभेतून काढलं बाहेर

काय म्हणाले होते आमदार?

आमदार चक्रवर्ती म्हणाले होते की, जे भाजपचे कट्टर समर्थक आहेत त्यांना घाबरवा आणि धमकवा. त्यांना सांगा की ते मतदानाला गेले नाहीत तर ते आमच्या समर्थनात आहेत, असे आम्ही समजू. त्यांनी भाजपला मतदान केले नाही तरच ते बंगालमध्ये आपला व्यवसाय आणि नोकरी करु शकतील. पण जर त्यांनी भाजपला मतदान केले तर आम्ही बघून घेऊ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com