वाहनचालकांना दणका! पेट्रोल, डिझेल 9 दिवसांत 8 वेळा महागलं

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे.
Petrol Diesel prices hike News
Petrol Diesel prices hike NewsSarkarnama

मुंबई : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 9 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे वाढ झाली असून, आतापर्यंतची ही वाढ 5.60 रुपयांवर गेली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. (Petrol Diesel price hike News)

सुमारे चार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 9 दिवसांत 8 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 5.60 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 101.01 रुपये झाला असून, डिझेलचा दर 92.27 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 84 व 85 पैसे वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत डिझेलच्या दराने पुन्हा शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 115.88 रुपये आणि डिझेलचा दर 100.10 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

Petrol Diesel prices hike News
वाद पेटला! भाजपच्या दोन आमदारांना मार्शलनी विधानसभेतून काढलं बाहेर

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Petrol Diesel prices hike News
चंद्रकांतदादांच्या तीन लाख कार्यकर्त्यांवरून मुश्रीफ अन् घाटगेंचं भांडण!

देशात सध्या महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com