
Election Comission to AAP Sanjay Singh : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवर दिल्ली निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलं गेलं आहे. शिवाय संजय सिंह यांच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. निवडणूक आयोगाने संजय सिंह यांच्या नावाच्या पत्रात लिहिले, संजय सिंह यांचा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेणाऱ्यांची माहिती दिली नसल्याचा केलेला आरोप आणि डीईओ जाणुनबुजून मतदारांचे नाव मतदार यादीतून हटवत असल्याचा दावा, हे तथ्यदृष्ट्या बरोबर नाही आणि निराधार आहेत.''
संजय सिंह(Sanjay Singh) यांच्या पत्नीचे नाव मतदार यादीमधून नाव वगळण्याच्या प्रकरणीही निवडणूक आयोगाने उत्तर देत म्हटले की, मतदारयादीतून नाव हटवण्याबाबत प्राप्त दोन्ही तक्रारी निराधार आढळल्या आहेत. ज्या लोकांनी तक्रार केली होती, त्यांच्याविरोधात एफआयआर देखील नोंदवला गेला.
निवडणूक आयोगाकडून म्हटले गेल की, भारताच्या निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशनुसार फॉर्म 7 चा सारांश, ज्यात आक्षेप घेणारे दोन्ही नावे समाविष्ट आहेत. जी आम आदमी पार्टीसह(AAP) सर्वच मान्यताप्राप्त राजकीय पक्षासोबत शेअर केली जातात. फॉर्म 10च्या माध्यमातून साप्ताहिक आधारावर केली जात आहे. याशिवाय ही माहिती सार्वजिनक पोहच आणि पारदर्शितेसाठी सीईओ दिल्ली यांच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जात आहे.
निवडणूक आयोगाने((Election Commision)) म्हटले की, हे म्हणणे की आक्षेपकर्त्यांची नावे शेअर केली जात नाही, तथ्यात्मकदृष्ट्या योग्य नाही. संदर्भासाठी फॉर्म 10 एक प्रत संलग्न आहे, जिथे आक्षेप घेणाऱ्यांची नावे स्पष्टपणे पडतळता येतील.
मतदार यादीतून नाव हटवण्याच्या आरोपांवर आयोगाने म्हटले की, मतदार यादीतून कोणतेही नाव हटवण्याची प्रक्रिया ईसीआयद्वारे जारी दिशानिर्देशानुसार सक्तीने केली जातात. प्रक्रिया फॉर्म 7 दाखल करण्यासोबतच सुरू होते आणि अशा सर्व प्रकरणांमध्ये निर्धारित मानदंडनुसार बूथ स्तरावरील अधिकारी (बीएलओ) पर्यवेक्षेक आणि अन्य अधिकाऱ्यांद्वारे गहन क्षेत्र पडताळणी केली जाते. केवळ हटवण्यासाठी यादी जमा केल्याने हटवण्याची प्रक्रिया सुरू होत नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.