Election Commission: मोठी बातमी: निवडणूक आयोगाकडून बोगस मतदारांची गंभीर दखल; लवकरच मोठा निर्णय घेणार

Voting Card And Aadhar Card Linking: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बोगस मतदानाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. विरोधकांनी ईव्हीएम आणि बोगस मतदारांवरुन गंभीर आरोप केले होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शिर्डीतील एकाच इमारतीतील 7 हजार मतदारांचा उपस्थित केल्यामुळे महायुतीला प्रचंड यशावरच शंका उपस्थित करण्यात आली होती.
Election commission-voter id
Election commission-voter idSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच मोठे पाऊल उचलणार आहे.पॅन कार्ड नंतर आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.या संदर्भात दिल्लीत मंगळवारी (ता.18) महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मतदानकार्ड आधार कार्डला लिंक करण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

भारतीय संविधानानुसार भारतीय नागारिकालाच मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान कार्ड जर आधारकार्डशी लिंक करण्यात आलं तर संबंधित व्यक्तीची ओळख समजण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र,त्यामुळेच मतदान कार्ड आणि आधार क्रमांक लिंक केले जाणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) संविधान,लोकप्रतिनिधी कायदा व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी काळात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञांसोबत याबाबत चर्चा करणार आहे.

Election commission-voter id
ShaktiPeeth Highway : एकीकडे फडणवीस अन् दुसरीकडे शेतकरी... महायुतीचे आमदार धर्मसंकटात!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बोगस मतदानाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. विरोधकांनी ईव्हीएम आणि बोगस मतदारांवरुन गंभीर आरोप केले होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शिर्डीतील एकाच इमारतीतील 7 हजार मतदारांचा उपस्थित केल्यामुळे महायुतीला प्रचंड यशावरच शंका उपस्थित करण्यात आली होती.

आता याचदरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं आधार लिंकिंगमुळे नकली मतदार ओळखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मतदानकार्ड (Voting Card) आधार कार्डला लिंक करण्यात येण्याच्या निर्णयामुळे एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नोंद टाळली जाण्यास मदत होणार आहे. तसेच मतदारयादीतील बोगस नावांमुळे उडणारा गोंधळ कमी होऊन अधिक पारदर्शी कारभार पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.

Election commission-voter id
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला, पोलिस लवकरच मुसक्या आवळणार

केंद्रीय निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसारच मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याविषयीचा मोठा निर्णय घेणार आहे. दिल्लीतील बैठकीत याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला असून तज्ज्ञांसोबत या निर्णयावर लवकरच विचारविनिमय केला जाणार आहे.

आधारकार्ड लिंकिंगमुळे प्रत्येक मतदाराची ओळख निश्चित करण्यासोबतच निवडणूक प्रक्रियेतही पारदर्शकता आणता येणार असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. मतदारांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी ठराविक कालावधीही दिला जाणार आहे.

Election commission-voter id
MLC Election : मोठी बातमी : विधान परिषद पोटनिवडणुकीत एक अर्ज बाद, आमदारकीचे स्वप्न भंगले

ऑनलाईन आणि ऑफलाईन असेही दोनही पर्याय त्यासाठी उपलब्ध राहणार असल्याची शक्यता आहे. तसेच निवडणूक आयोगानं आधारकार्ड मतदानकार्डशी लिंक करण्याच्या प्रक्रियेनंतर मतदारांची गोपनीयता आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याविषयी स्पष्टीकरण देतानाच आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबतची खात्री देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com