Election Commission : निवडणुकीनंतर आयोगाचे खर्गेंना पत्र; थेट कार्यालयातच भेटायला बोलावले... 

Mallikarjun Kharge Haryana Election Result Congress : हरियाणातील अनपेक्षित पराभव काँग्रेसने अमान्य करत ईव्हीएम मशीनशी छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे.
Election Commission BJP Congress
Election Commission BJP CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : हरियाणामध्ये अनपेक्षित पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट ईव्हीएमकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे हा पराभव आपल्याला मान्य नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने थेट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे.

हरियाणामध्ये भाजपला 48 तर काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला आहे. हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. निकालानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. हा ईव्हीएम मशीनचा विजय असून लोकशाहीचा पराभव असल्याचे त्यांनी म्हटले होते.

आयोगाने नेत्यांच्या या विधानांवर नाराजी व्यक्त करणारे पत्र खर्गेंना लिहिले आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्यांना भेटीची वेळही दिली आहे. आजच सायंकाळी आयोगाच्या कार्यालयात काँग्रेसच्या शिष्यमंडळाला बोलावण्यात आले आहे. या भेटीत काँग्रेसच्या आरोपांवर आयोगाकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान आयोगाने पत्रात म्हटले आहे की, निवडणुकीतील अनपेक्षित निकालावर पक्षाच्या अध्यक्षांची भूमिका आम्ही समजू शकतो. पण काही नेत्यांची विधाने स्वीकारार्ह नाहीत. देशातील लोकशाहीला समृध्द वारसा आहे. यामध्ये अशी विधाने योग्य नाहीत. मुख्य भाषण आणि अभिव्यक्तीपासून ही विधाने खूप दूर आहेत.

देशात घटनातम्क आणि नियामक निवडणूकीच्या प्रक्रियेतून व्यक्त झालेल्या लोकांच्या इच्छेला लोकशाहीविरोधी दाखवत त्याचा स्वीकार न करण्याच्या दिशेने ही विधाने जात आहेत. हीच प्रक्रिया जम्मू-काश्मीर आणि हरियाणासह देशातील सर्वच राज्यांत समान लागू होते, असे आयोगाने पत्रात नमूद केले आहे.

तुमच्या व विरोधी पक्षनेत्यांची विधानेही लक्षात घेतली आहेत. त्यामध्ये हरियाणातील निकाल अमान्य असल्याचे म्हटले आहे. तसेच या निकालाचे विश्लेषण करणे आणि आपल्या तक्रारींसह निवडणूक आयोगाची भेट घेण्याबाबतही बोलण्यात आले आहे. निवडणूक आयोगाला एक विनंती प्राप्त झाली आहे की, 12 सदस्यीय शिष्टमंडळाने भेटीसाठी वेळ मागितली आहे, असे पत्रात नमूद करताना आयोगाने सायंकाळी सहा वाजताची भेटीची वेळही कळवली आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com