काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार तिरंगी : झारखंडचा दिग्गज नेता मैदानात!

Congress President Election : १७ ऑक्टोबरला मतदान तर १९ ऑक्टोबरला निकाल..
Congress President Election
Congress President Election Sarkanama

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. खासदार शशी थरूर यांनी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी एआयसीसी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केला. त्याचवेळी झारखंड काँग्रेसचे नेते के. एन. त्रिपाठी यांनीही अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीच ते म्हणाले होते की, "मी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणार आहे. त्यानंतरच मी यावर अधिक बोलेन." काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हुड्डा म्हणाले, "आम्हाला आशा आहे की, त्यांची निवड होईल. हरियाणातून भूपिंदर सिंग हुडा आणि मी खर्गेंच्या उमेदवारी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे."

Congress President Election
Congress President : निवडणुकीत ट्विस्ट दिग्विजय सिंह यांची माघार ; मल्लिकार्जुन खर्गे रिंगणात ?

दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली :

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आहे आणि यापुढेही करत राहीन. मात्र आपण निवडणूक लढवणार नसून, सहकारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीमध्ये मी अनुमोदक असेन, असे सिंह यांनी सांगितले.

गेहलोत यांनी यापूर्वीच निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे :

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर सिंह यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेसच्या 'एक व्यक्ती, एक पद' या नितीप्रमाणे निवडणूक लढवण्यासाठी गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.

Congress President Election
Shiv Sena : बंडखोर आमदार राठोडांचे समर्थक सुनील महाराज शिवसेनेत ; ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

17 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयाच्या पक्षाचे नेते दुपारी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com