Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षांची निवड 26 जूनला ; जाणून घ्या, कोणती नावे आहेत शर्यतीत!

18th Lok Sabha Speaker News :18व्या लोकसभेचं पहिलं सत्र 24 जून रोजी सुरू होणार आहे. हे सत्र 3 जुलै पर्यंत चालेल.
Lok Sabha Speaker
Lok Sabha Speaker Sarkarnama

Lok Sabha Speaker Election and NDA : देशात लोकसभा निवडणूक पार पडून सत्तेत पुन्हा एकदा एनडीए आघाडीचे मोदी सरकारचं आले आहे. त्यानंतर आता या 18व्या लोकसभेचं पहिलं सत्र 24 जून रोजी सुरू होणार आहे. हे सत्र 3 जुलै पर्यंत चालेल. तर 27 ते 3 जुलैपर्यंत राज्यसभेचं सत्र असणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सर्वात पुढे आहेत. याशिवाय भृतहरि महताब आणि डी पुरंदेश्वरी यांच्या नावांचीही चर्चा आहे. तेच चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीशकुमार यांच्या जेडीयू कडूनही अध्यक्षपदाची मागणी केली गेली आहे.

Lok Sabha Speaker
Rahul Gandhi Waynad Resign : मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडचा राजीनामा देणार; प्रियांका गांधींचंही ठरलं

महताब भतृहरि ओडिशामधील एक प्रमुख भाजप नेते आहे. ते आधी नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलमध्ये होते. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. तर डी पुरंदरेश्वरी आंध्रप्रदेश भाजपच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली याचबरोबर ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी करत बीजेडीला 24 वर्षानंतर सत्तेतून खाली खेचलं आणि राज्यात सरकार बनवलं.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 जून रोजी पंतप्रधान मोदी लोकसभा अध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव सादर करतील. लोकसभा अध्यक्ष निवडल्या गेल्यानंतर ते आपल्या मंत्रिमंडळाचा परिचय देतील. यानंतर खासदारांचा शपथविधी होईल.

Lok Sabha Speaker
Priyanka Gandhi Wayanad : गांधी कुटुंबाला मिळणार तिसरा खासदार; प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार?

तर उपाध्यक्ष पदद हे विरोधकांना देण्याची परंपरा आहे. यंदा विरोधी पक्षांची INDIA आघाडी सुद्धा लोकसभेत चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे लोकसभेचं उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाच्या एखाद्या खासदारास दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 16 व्या लोकसभेत NDA मध्ये सहभागी अण्णाद्रमुकचे थंबीदुरई यांना हे पद दिले गेले होतं. तर 17व्या लोकसभेत हे पद कुणालाही दिलं गेलं नव्हतं.

लोकसभा अध्यक्ष पद हे सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीच्या ताकतीचं प्रतीक असतं. लोकसभेचं कामकाज अध्यक्षच नियंत्रित करतो. संविधानात लोकसभा अध्यक्षाबरोबरच उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचीही तरतूद आहे. जे अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांची जबाबदारी सांभाळतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com