Rahul Gandhi Waynad Resign : मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडचा राजीनामा देणार; प्रियांका गांधींचंही ठरलं

Priyanka Gandhi : राहुल गांधींच्या रिक्त झालेल्या वायनाडच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी लढणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Congress Politics : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता त्यांना 14 दिवसांच्या आत एका जागेची निवड करणे बंधनकारक होते. त्यानुसार राहुल गांधी आता केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. तर त्यांच्या रिक्त जागी वायनाडमधून प्रियांका गांधी लढणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केले आहे.

राहुल गांधी Rahul Gandhi 2019 मध्ये वायनाडमधून निवडून आले होते. यावेळी त्यांनी वायनाडसह रायबरेलीतूनही बाजी मारली. रायबरेलीतून राहुल यांना 3 लाख 90 हजारांचे तर वायनाडमध्ये 3 लाख 64 हजारांच्या मताधिक्य मिळाले आहे. परिणामी दोन्हीपैकी कोणता मतदारसंघ निवडायचा याबाबत राहुल गांधींसह काँग्रेसपुढे भावनिक पेच निर्माण झाला होता. यातून मार्ग काढत खर्गे यांनी राहुल गांधी वायनाडमधून राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. तर त्या जागेवरून प्रियांका गांधी लढणार असल्याचीही घोषणा केली.

Rahul Gandhi
Sharad Pawar : शरद पवारांची विधानसभेसाठी 'पेरणी'; उद्यापासून मेळावा आणि बैठकांचा धडाका

काँग्रेस Congress नेत्यांनी विचारमंथन केल्यानंतर उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून राहुल गांधींनी खासदार म्हणून काम करण्याचे ठरले आहे. रायबरेली आणि गांधी घराण्याचे जवळचे संबंध आहेत. तसेच हा मतदारसंघ जवळचा पडतो. रायबरेलीतील लोकांचेही त्याला समर्थन आहे. तसेच वायनाडमधील लोकांनीही राहुल यांनी रायबरेलीतून खासदार राहण्याचा सल्ला दिला. त्यातूनच हा निर्णय घेणे सोपे झाल्याचेही खर्गेंनी स्पष्ट केले.

काय आहे नियम?

अधिनियम 1951 कलम 68 ( 1 ) नुसार दोन मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनं 14 दिवसांनी एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. 4 जूनला निवडणुकीचे निकाल हाती आले होती. त्यामुळे दोन मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना राजीनामा देण्याची अंतिम मुदत 18 जून आहे. राजीनामा दिला नाहीतर काय होणार? नियमांनुसार लोकप्रतिनिधीनं 14 दिवसांत एका जागेवरून राजीनामा नाही दिला, तर त्यांचे सदस्यत्व रद्द होते. तसेच, दोन्ही जागा रिक्त मानल्या जातात.

Rahul Gandhi
Video Suraj Suryawanshi : दारुच्या बाटल्या अन् भाजप मंत्र्याचा डान्स; काँग्रेस संतापली, राजीनामाही मागितला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com