

Notice issued to wife election notice news : देशभरात मतदार यादी अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी निवडणूक आयोगाकडून स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या प्रक्रियेत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांची महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक मतदाराची माहिती तपासणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि शंका असल्यास नोटीस देणे हे काम त्यांच्याकडे असते. पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यात या प्रक्रियेदरम्यान समोर आलेला एक वेगळाच प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
कटवा शहरातील बूथ क्रमांक 165 साठी नियुक्त असलेले देबाशंकर चट्टोपाध्याय हे केतुग्रामच्या भोमरकोल प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. SIR अंतर्गत मतदार यादीची तपासणी सुरू असताना त्यांच्या स्वतःच्या आणि पत्नी अनिंदिता चौधरी यांच्या कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक आणि तार्किक त्रुटी आढळून आल्या. निवडणूक आयोगाच्या अॅपवरून यासंदर्भात नोटीस तयार होताच देबाशंकर यांनी कोणताही संकोच न करता नियमांनुसार कारवाई केली.
दुपारच्या वेळी अनिंदिता घरी विश्रांती घेत असताना देबाशंकर यांनी त्यांच्याकडे जाऊन SIR सुनावणीची नोटीस दिली. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःलाही त्याच प्रक्रियेत समाविष्ट केले. पतीने नियमांसाठी नातेसंबंध बाजूला ठेवले हे पाहून अनिंदिता काही क्षण आश्चर्यचकित झाल्या. मात्र या घटनेतून प्रशासनातील निष्पक्षतेचे उदाहरण समोर आले.
निवडणूक आयोगाने देबाशंकर यांच्या वडिलांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये आणि आडनावासंदर्भातील विसंगतीकडे लक्ष वेधले. जरी 2002 च्या मतदार यादीत नाव योग्य नोंदलेले असले, तरीही सध्याच्या नियमांनुसार नोटीस देण्यात आली. अनिंदिता चौधरी यांच्या प्रकरणात त्यांच्या वयात आणि वडिलांच्या वयात जवळपास 50 वर्षांचे अंतर दाखवले गेले असल्याने त्यावर आक्षेप नोंदवण्यात आला. अनिंदितांचे माहेर नदीया जिल्ह्यातील नकाशीपारा येथे असून त्यांच्या वडिलांचे नाव अनिल चटर्जी आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना देबाशंकर चट्टोपाध्याय म्हणाले की, आपण बीएलओ असलो तरी निवडणूक आयोगाच्या नियमांपेक्षा कोणीही मोठे नाही. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत, मग ते कुटुंबातील सदस्य का असेनात. त्यामुळे इतर नागरिकांप्रमाणेच आपण आणि पत्नी सुनावणीसाठी हजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.