Municipal Election : खळबळजनक! मतदानापूर्वीच 'पैशांचा पाऊस'; नोटांची थप्पी पाहून पोलीसही थक्क! पाहा धक्कादायक व्हिडिओ

police shocked after cash seizure : मतदानापूर्वी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त. नोटांच्या थप्प्या पाहून पोलीसही थक्क. निवडणूक आचारसंहितेवर प्रश्नचिन्ह.
election cash seizure, money before voting,
election cash seizure, money before voting,Sarkarnama
Published on
Updated on

राज्यभारात महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरु असतानाच अकोल्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी चांगलेच वातावरण तापलेले दिसले. अनेक मोठ्या नेत्यांची आणि पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागली असून, कोणत्या महापालिकेवर कोणाचा ताबा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र निकालापूर्वीच पैशांच्या गैरव्यवहाराच्या घटनांनी निवडणूक प्रक्रियेवर मोठा गोंधळ झाला आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येला अकोल्यात तब्बल 50 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणात सापडलेली नोटांची बंडले पाहून पोलिसही काही काळ चक्रावले होते. निवडणुकीच्या तोंडावर इतकी मोठी रोकड सापडल्याने मतदारांना पैसे देऊन प्रभावित करण्याचा संशय अधिक बळावला आहे.

election cash seizure, money before voting,
Nashik NMC Election : मंत्री गिरीश महाजनांना अडवणं भोवलं, सिडकोतील बाप लेकावर पोलिसांची मोठी कारवाई

ही घटना अकोल्यातील प्रभाग क्रमांक 15 मधील सिंधी कँप परिसरात घडली. काल रात्री या भागात पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून दोन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. एकीकडे भाजपकडून मतदारांना पैसे दिले जात असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या आरोपानंतर वातावरण तणावपूर्ण झाले आणि दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काही काळासाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणत त्यांनी परिसरात बंदोबस्त वाढवला. याचदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ताब्यात घेतली. नोटांचे बंडल आणि रोख रक्कमेची रक्कम पाहता ही रक्कम निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकारासाठी वापरली जाणार होती का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणावर अकोला पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणूक काळात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या 50 लाख रुपयांच्या रोख रकमेचा स्रोत, ती कुणाची आहे आणि कुठल्या उद्देशाने ठेवण्यात आली होती, याची सखोल चौकशी सुरू आहे. आवश्यक त्या कायदेशीर कारवाईचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत.

election cash seizure, money before voting,
Voter Fraud Mumbai : दुबार मतदार सापडला, उमेदवारासमोरच सगळा खेळ; मनसे 'फोडाफोडी' करणार की, गप्प बसणार?

दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शक आणि निर्भय वातावरणात व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. अकोल्यातील या घटनेमुळे मात्र निवडणूकपूर्व वातावरण अधिकच तापले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com