Mallikarjun Kharge : कर्नाटकात खर्गेंच्या नेतृत्वाचा कस; होम ग्राऊंड देणार अध्यक्षीय इनिंगसाठी पाठबळ...

Karnataka Assembly Elections News : मल्लिकार्जून खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये निवडणूक होत आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections : कर्नाटकची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) थेट लढत आहे. मात्र, यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये (Karnataka) निवडणूक होत आहे. त्यामुळे होम ग्राऊंडवर खर्गे यांचा कस लागणार आहे.

या निवडणुकांच्या निमित्ताने कॉंग्रेस कशी लढत देते आणि यश मिळवते त्यावर खर्गेंच्या नेतृत्वाचे आणि कार्यपद्धतीचे मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे खर्गे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले तर खर्गे यांना पुढील निवडणुकांना सामोरे जाताना बळ मिळेल. तसेच काँग्रेसलाही नवी उर्जा मिळले. राष्ट्रीय पातळीवरही खर्गे यांचा दबदबा वाढेल. त्याचा फायदा त्यांना इतर राज्यामध्ये निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी होऊ शकतो.

Mallikarjun Kharge
Maharashtra politics : ''अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे परत येण्याच्या प्रयत्नात''

खर्गे हे १९७२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तेव्हापासून या राज्यात जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा तेव्हा ते मंत्री होते. त्यामुळे खर्गे यांना कर्नाटकची नस माहिती आहे. त्यांचे गृहराज्य असल्याने काँग्रेस अध्यक्षांच्या राज्यात विजय मिळाला तर ते पक्षाला बळ देणारे ठरेल. मात्र, काँग्रेसचा पराभव झाला तर खर्गे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. काँग्रेससाठी कर्नाटकमध्ये संधी असल्याचे बोलले जात आहे.

ओपिनियन पोलमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नेत्यांची मोट बांधत त्यांना एकत्रित आण्णयाचे आवाहन खर्गे यांच्यासमोर असणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांना आप-आपसातील सगळे मतभेत विसरुन निवडणूक एकत्र लढली तर त्यांच्यासाठी विजयाचे गणित सोपे होईल, यावर खर्गे कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. एकंदरीतच या निवडणुकीत खर्गे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

Mallikarjun Kharge
Sharad Pawar Nagpur News : नागपुरात पोहोचलेल्या पवारांनी घेतली गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

कर्नाटकची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे. 10 मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. येत्या 24 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वीच निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांवर निवडणूक होणार आहे. सध्या 224 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे 69 आमदार आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तेव्हा २२४ पैकी भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ८० व जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com