Electoral Bond
Electoral BondSarkarnama

Electoral Bond News : अजब बाँडची गजब कहाणी! निनावी लिफाफ्यातून थेट पक्ष कार्यालयात दहा-दहा कोटींची देणगी

Election Commission of India : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने रविवारी इलेक्ट्राेल बाँडची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांकडून देणगी कशी मिळाली, याबाबत अजब दावे केले आहेत.
Published on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मागील काही दिवसांपासून इलेक्ट्राेल बाँड (Electoral Bond News) म्हणजेच निवडणूक रोख्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. कोणत्या पक्षाला किती रोखे, कोणत्या कंपनीकडून मिळाले यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने रोख्यांबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे करणारा डाटा वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांनी रोखे कसे मिळाले, याबाबत अजब दावे केल्याचे समोर आले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार, काल निवडणूक आयोगाने (Election Commission) रोख्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. अद्याप स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) युनिक कोड आयोगाकडे दिलेले नाहीत. त्यासाठी कोर्टाने आजची मुदत दिली आहे. त्यामुळे ही माहितीही आज आयोगाला मिळू शकते. त्यानंतर कुणी कोणत्या पक्षाला किती देणगी दिली हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, राजकीय पक्षांनी (Political Parties) दिलेल्या माहितीनुसार अनेक खुलासे झाले आहेत.

Electoral Bond
Assembly Bypolls 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) दिलेल्या माहितीनुसार, एक निनावी लिफाफा कार्यालयात आला होता. त्यामध्ये एक-एक कोटींचे दहा रोखे होते. हे सर्व रोखे 7 मे 2019 या तारखेचे होते. पक्षाला 10.84 कोटींचे रोखे मिळाले ते वटवण्यात आले आहेत. दहा कोटी रुपये अज्ञात देणगीदाराकडून मिळाल्याचे सपाने म्हटले आहे. इतर कोणत्या कंपन्यांकडून देणगी मिळाली ते नावासह दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दलालाही दहा कोटी रुपये अज्ञात देणगीदाराकडून मिळाले आहेत. 2019 मध्ये 3 एप्रिलला एका व्यक्तीने पक्षाच्या कार्यालयात येऊन सीलबंद लिफाफा दिला होता. हा लिफाफा उघडल्यानंतर त्यामध्ये एक-एक कोटींचे दहा रोखे होते, असे पक्षाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे श्री सिमेंट आणि भारती एअरटेलकडूनही देणगी मिळाली आहे. एकूण 24.4 कोटींची देणगी जेडीयूला मिळाली आहे.

दरम्यान, सर्वाधिक जवळपास सात हजार कोटींची देणगी भाजपला मिळाली आहे. त्याखालोखाल तृणमूल आणि काँग्रेसचा नंबर लागतो. के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक 1 हजार 368 कोटींची देणगी फ्यूचर गेमिंग कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यापैकी 37 टक्के देणगी एकट्या डीएमकेला मिळाली आहे.

R

Electoral Bond
Mahadev App Case : निवडणुकीआधी काँग्रेसचा बडा नेता अडचणीत; महादेव अॅप प्रकरणात गुन्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com