Electricity Subcidy Stop In Delhi : दिल्लीतील मोफत वीज आजपासून बंद; राज्यपालांवर फोडले खापर!

Atisho marlena on Electricity Subcidy : राज्यपालांनी प्रस्ताव मंजूर केला नाही?
Electricity Subcidy Stop In Delhi : Arvind Kejariwal : Atishi
Electricity Subcidy Stop In Delhi : Arvind Kejariwal : Atishi Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : आजपासून दिल्लीत मोफत वीज मिळणार नाही, असा निर्णय दिल्लीतील अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारने स्पष्ट केले आहे. आज शुक्रवारी त्याची घोषणा करण्यात आली. दिल्लीच्या वीज मंत्री आतिशी मार्लेना यांनी नायाब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना फटकारले आहे.

आतिशी मार्लेना पत्रकार घेतली, या परिषदेत त्या म्हणाल्या, "अरविंद केजरीवाल सरकार वीज अनुदान देते, ज्या अंतर्गत 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळते. 200 ते 400 युनिटपर्यंतचे 50 टक्के बिल माफ केले आहे. वकील, शेतकरी, तसेच 84 दंगलीतील पीडितांना अनुदान दिले जाते. आजपासून वीज सबसिडी बंद होणार आहे. म्हणजेच उद्यापासून दिल्लीतील ग्राहकांना मिळणाऱ्या वीज बिलात सबसिडी मिळणार नाही. ज्याला शून्य बिले मिळायची, आता त्याला वाढीव बिले मिळू लागतील. ज्यांना 50 टक्के सूट मिळायची. आता त्यांनाही वाढीव बिले मिळू लागतील.

Electricity Subcidy Stop In Delhi : Arvind Kejariwal : Atishi
Congress News : काँग्रेसला पुन्हा मोठा झटका? राजगोपालाचारी यांचे पणतू भाजपात जाण्याची शक्यता..

नायाब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची खिल्ली उडवत मार्लेना म्हणाल्या, 'केजरीवाल सरकारच्या मंत्रिमंडळाने येत्या वर्षातही वीज सबसिडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता, यामुळे ही सबसिडी थांबवली गेली आहे. या प्रस्तावाची फाईल राज्यपालांनी स्वत:जवळ ठेवली आहे. या प्रस्तावाची फाईल राज्यपालांकडे पाठवल्यामुळे त्यांच्या कार्यालयाने ती तशीच ठेवून दिली आहे. जोपर्यंत ती फाइल परत येत नाही, तोपर्यंत केजरीवाल सरकार अनुदान देवू शकत नाही.

मार्लेना म्हणाल्या की, "अरविंद केजरीवाल सरकारकडे निधी केली आहे. निधी विधानसभेने मंजूर केले आहेत, आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे, मात्र हा निर्णय घेऊनही, अनुदान बंद होणार आहे."

Electricity Subcidy Stop In Delhi : Arvind Kejariwal : Atishi
Karnataka Election 2023 : भाजपला मोठा झटका ; तिकीट न मिळाल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..

त्या पुढे म्हणाल्या, 'काल मला दिल्लीमधील कंपनी (टाटा पॉवर) कडून एक पत्र मिळाले, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांना येत्या वर्षासाठी सबसिडीची माहिती मिळाली नाही, यामुळे ते आजपासून सबसिडीशिवाय सामान्य बिलिंग सुरू करतील. बीएसईएसच्या दोन्ही डिस्कॉममधूनही हीच माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com