Karnataka Election 2023 : भाजपला मोठा झटका ; तिकीट न मिळाल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..

Laxman Savadi has joined congress : सावदीच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपमधून मोठा नेता काँग्रेसमध्ये आला आहे.
Karnataka Election 2023
Karnataka Election 2023 Sarkarnama
Published on
Updated on

BJP Leader and former karnataka deputy cm laxman savadi has joined congress today : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे.

भाजप नेता, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी आज (शुक्रवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी ही माहिती दिली आहे.

दोन दिवसापूर्वी सावदी यांचे भाजपने तिकीट कापले होते. तेव्हापासून ते नाराज होते, ते अथानी विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढण्यास इच्छुक होते. यापूर्वी काँग्रेसमधून अनेक मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत, पण सावदीच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपमधून मोठा नेता काँग्रेसमध्ये आला आहे.

Karnataka Election 2023
Ambadas Danve News : छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीला पोलिसच जबाबदार ? ; दानवेंचा आरोप ; गृहखातं काय करत होतं..

लक्ष्मण सावदी (Laxman Savadi) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना कुठलीही अट ठेवलेली नाही, कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता ते काँग्रेमध्ये सामील झाले आहेत, अजून ९ ते १० भाजपचे विद्ममान आमदार काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, पण त्यांना तिकीट देण्यास आम्ही असमर्थ आहोत, असे डीके शिवकुमार यांनी सांगितले. सावदी यांनी डीके शिवकुमार आणि विरोधी पक्ष नेता सिद्धारमैया यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

Karnataka Election 2023
Karnataka Election 2023 : वडीलांची राजकीय गादी जिंकण्यासाठी सख्ये भाऊ आमने-सामने

भाजपने मंगळवारी रात्री उमेदवाराची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. लक्ष्मण सावदी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. "मी भीकेचा कटोरा घेऊन फिरणारा नेता नाही, मी एक स्वाभीमानी नेता आहे. कुणाच्या राजकीय दडपणाखाली काम करणार नाही," अशा शब्दात सावदी यांनी पक्षश्रेष्ठींना सुनावलं होतं निवडणूक तोंडावर आली असताना सावदी यांनी राजीनामा दिल्याने त्यांचा भाजपला मोठा फटका बसणार आहे.

सावदी हे अथानी मतदार संघातून तीन वेळा निवडून आले आहेत. २०१८ मध्ये कुमथल्ली मतदार संघात त्यांचा पराभव झाला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सावदी हे काँग्रेमध्ये सामील होते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती ती आज खरी ठरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com